Prathamesh Parab Wedding: अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नपत्रिकेने वेधलं लक्ष

Prathamesh Parab Wedding: गाजलेला मराठी चित्रपट ‘टाईमपास’ यात दगडूच्या भूमिकेत लोकप्रिय झालेला मराठी अभिनेता प्रथमेश परब आता मराठी मधील एक प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. सध्या अभिनेता प्रथमेश परब हा त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता लवकरच तो लग्न करतोय. (Marathi Actor Prathamesh Parab Wedding with his Girlfriend Kshitija Ghosalkar)

अभिनेता प्रथमेश परब याने गेल्या वर्षभरापूर्वी म्हणजेच 2023 मध्ये व्हॅलेंटाईन डेला त्याच्या खऱ्या प्रेमाची कबुली दिली होती. त्याच्या या गर्लफ्रेंडचे नाव क्षितिजा घोसाळकर असं आहे. आता हे दोघे लवकरच लग्न करणार आहे.

अभिनेता प्रथमेशची होणारी पत्नी क्षितिजा घोसाळकरने नुकतंच त्यांच्या त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मिडियावर शेअर केली आहे. यात तिने त्यांच्या साखरपुड्याची आणि लग्नाची तारीख सांगितली आहे. यावर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच 14 फेब्रुवारीला त्यांचा साखरपुडा होणार आहे आणि त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच 24 फेब्रुवारीला हे दोघे लग्न करणार आहे. क्षितिजाने शेअर केलेल्या त्यांच्या या लग्न पत्रिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रथमेश परब याने त्यांचे केळवणाचे फोटो व व्हिडीओही शेअर केले होते. यातील त्यांचा व्हिडिओ सर्व प्रेक्षकांना खूप आवडला होता.

अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांना त्यांच्या साखरपुडा आणि लग्नासाठी खूप साऱ्या सुभेच्छा.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त