Makarand Anaspure Advice To Farmers: “2 एकर शेतीला ट्रॅक्टर कशाला पाहिजे..” मकरंद अनासपुरेंचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

Makarand Anaspure Advice To Farmers: शेती करणाऱ्या मुलांना आजकाल लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही. मग तो मुलगा उच्च शिक्षण घेऊन शेती करणारा असला तरी अनेक मुली शेती करणाऱ्या मुलासोबत लग्न करायला तयार होत नाही. हे आजकाल आपल्या देशात बघायला मिळणारं एक भयानक चित्र आहे. त्यामुळेच आजकाल अनेक तरुण गावाला आपल्या मालकीची शेती असून सुद्धा ती शेती न करता शहरात कमी पगाराच्या नोकरी करतांना दिसतात. म्हणूनच शेती विषयी लोकांचा हा चुकीचा दृष्टीकोन बदलावा या उद्देशानेच अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांचा ‘नवरदेव बीएसस्सी ऍग्री’ (Navardev Bsc. Agri) हा नवीन चित्रपट येत आहे. (“Why does a 2 acre farm need a tractor..” Actor Makarand Anaspure’s valuable advice to farmers)

नवरदेव बीएसस्सी ऍग्री चित्रपट

‘नवरदेव बीएसस्सी ऍग्री’ हा मराठी चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, हार्दिक जोशी, प्रवीण तरडे, क्षितीज दाते, प्रियदर्शनी इंदलकर, गार्गी फुले, रमेश परदेशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गलगुंडे ई हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्तानेच अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांनी कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टीने त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

2 एकर शेतीला ट्रॅक्टर कशाला पाहिजे..

या मुलाखतीत अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले आहे की “माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्याची 2 एकर शेती आहे त्याने स्वतःचा वयक्तिक ट्रॅक्टर कशाला घ्यायला पाहिजे?. ट्रॅक्टरची जाहिरात करताना ती आयडियलीच केली जाते की ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला एक लाखाची सबसिडी दिली जाते. पण सबसिडीचे ते एक लाख मिळवण्यासाठी तुम्ही 5 लाखांचं लोन घेणार. पण मग तुम्हाला 2 एकरासाठी ट्रॅक्टर कशाला पाहिजे.

यावर उपाय म्हणजे तुम्ही 5 शेतकरी एकत्र या, म्हणजे तुमची एकूण 10 एकर शेती होईल. एवढंच नाही तर ते 5 लाखांचं लोन देखील तुम्हाला 5 जणांमध्ये विभागून घेता येईल. हेच जर तुम्ही 20 जणांनी एकत्र येऊन केलं, तर तुमच्या लोनची अमाउंट आणखी कमी होईल. ट्रॅक्टर तुम्हाला तुमच्या तेवढ्याच कामापूरता लागणार आहे.

यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शेतात कामं करण्यासाठी आजकाल मजूर मिळत नाहीत. पण हेच जर तुम्ही 20 जणं एकत्र मिळून काम करणार असाल तर 40 एकर शेतीसाठी घरातील आणखी काही व्यक्ती त्या कामात सहभागी होतील आणि त्यातून तुम्ही एकमेकांची नक्कीच मदत करू शकता. लहानपणी आपण सगळ्यांनीच एक गोष्ट ऐकली आहे एक लाकूड तुटतं पण त्याची मोळी बांधली तर ती एकट्याला तोडायला शक्य नसतं”.

अशा प्रकारे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांना एकत्र येऊन शेती करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त