Kiran Mane vs Pushkar Jog: अभिनेते किरण मानेंनी पुष्करला सुनावलं – नेत्याला लाथा घाल, लै महागात पडेल, मापात रहा

Kiran Mane vs Pushkar Jog: सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी जातीय सर्वे सुरु आहे. यात अनेक सरकारी कर्मचारी किंवा सरकारी शिक्षक हे लोकांच्या घरी जाऊन त्यांची जात विचारत हा सर्वे करत आहे. यात हे कर्मचारी सरकारने त्यांना जे काम सोपवलंय तेच करताय. यात त्यांची काही चूक नाही. पण तरीही काही मराठी कलाकार या कर्मचाऱ्यांवर आपलं राग व्यक्त करताय. मराठी अभिनेता पुष्कर जोग याने तर या कर्मचाऱ्यांना लात आणि कानाखाली मारण्याची भाषा केली. यामुळे आता पुष्कर जोगवर खूप टीका होत आहे.

कर्मचाऱ्यांना लात आणि कानाखाली मारण्याची भाषा

अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर मराठा आरक्षणासाठी जात सर्वे करायला आलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल एक स्टोरी पोस्ट करत म्हटलं होतं की “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाईमाणूस नसते तर 2 लात नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार.” असं अभिनेता पुष्करने म्हटल होतं.

अभिनेता पुष्करची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. त्याच्यावर चौबाजूंनी टीका झाली. कारण सरकारने सोपवलेले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याने लात आणि कानाखाली मारण्याची भाषा केली. हे अनेकांना सहन झाले नाही. त्यामुळे अनेकांनी पुष्करवर टीका करत त्याचा चांगलेच सुनावले आहे. यातच आता प्रसिद्ध अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी सुद्धा पुष्करच्या या व्हायरल पोस्ट वर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे . तसेच किरण माने यांनी पुष्करला ओपन चॅलेंज सुद्धा दिलं आहे. (Actor Kiran Mane angry on Pushkar Jog)

किरण माने यांचे पुष्करला उत्तर

अभिनेते किरण माने यांनी पुष्करला उत्तर देत म्हटलंय की “आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय…” मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग नांवाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.” अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे.

किरण मानेंनी पुष्करला दिलं चॅलेंज

या पोस्ट मध्ये पुढे किरण माने यांनी पुष्कर जोगला चॅलेंज देत म्हटलंय की “तुला लाथाच घालायच्यात ना??? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा??? …मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल. खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या. बोल. आहे दम तुझ्या पार्श्वभागात???” असं म्हणत किरण मानेंनी पुष्करला जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घालण्याचे खुल्लं आव्हान दिलं आहे.

किरण मानेंनी पुष्करला सुनावलं

अभिनेता किरण मानेंनी पुढे त्यांच्या पोस्ट मध्ये पुष्करला चांगलंच सुनावलं आहे. यात किरण माने म्हणाले आहे की “अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कसला माज दाखवतो तू??? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा.” असं म्हणत किरण मानेंनी पुष्करला चांगलंच सुनावलं आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त