अभिनेता भूषण कडू स्वामीकृपेने सावरतोय.. बायकोचं निधन, 11 वर्षांचं लेकरू, पैसे संपले, आत्महत्येचा विचार | Bhushan Kadu Shocking Story

Bhushan Kadu Shocking Story: आपल्या विनोदांनी महाराष्ट्राला खळखळून हसवणारा एक गुणी मराठी अभिनेता भूषण कडू अचानक कुठे गायब झाला? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अनेकांनी तर अभिनेता भूषणने देश सोडलाय, किंवा तो या जगातच नाही.. वगैरे अशा अफवा पसरवल्या. पण नेमकं भूषणचं असं अचानक गायब होण्याचे कारण काय होतं? तर खऱ्या आयुष्यात अभिनेता भूषण अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड देत होता, तो अनेक संकटांचा सामना करत होता. नेमकं काय घडलं होतं त्याच्या खऱ्या आयुष्यात? याबद्दल आता भूषणने स्वतः लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत संपूर्ण खुलासा केला आहे. (Marathi Actor Bhushan Kadu Shocking Story)

भूषण कडूने सांगितली त्याची संघर्षमय कहाणी (Bhushan Kadu Shocking Story)

खऱ्या आयुष्यात सगळं अगदी छान सुरू असताना क्षणात चित्र कसं पालटलं याबद्दल सांगतांना भूषणने म्हटलंय की “मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरांत जाऊन पोहोचलो. प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं. मला हळुहळू सिनेमे मिळाले. माझं लग्न झालं. कादंबरीसारखी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली. आम्हाला मुलगा झाला. सगळं ‘मस्त चाललंय आमचं’ असं म्हणत असताना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जसे चढउतार येतात अगदी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. मी त्यावेळी अनेक दु:ख पचवली. वडिलांचं जाणं, आईचं जाणं मग आजीचं जाणं आणि त्यानंतर लॉकडाऊनचा काळ सुरू झाला आणि माझी ‘कादंबरी’ वाचायची अर्धवट राहून गेली. कोव्हिडची शेवटची लाट होती, तेव्हा ती देवाघरी गेली आणि आयुष्यात खूप मोठा हादरा बसला.”

Bhushan Kadu Shocking Story
Bhushan Kadu Shocking Story

अभिनेता भूषण (Bhushan Kadu) पुढे म्हणाला की “माझ्या पदरात 11 वर्षांचं लेकरू होतं. अचानक या गोष्टी घडल्यावर मी पूर्ण हललो. कादंबरी माझं सगळं मॅनेजमेंट सांभाळायची. एका बायकोचं नवऱ्याच्या आयुष्यातून निघून जाणं…आणि त्याने मला एवढा मोठा हादरा बसू शकतो तर, एखाद्या बाईचा नवरा जेव्हा तिला सोडून जातो तेव्हा त्या बाईचं काय होत असेल? तिचं महत्त्व मला पूर्णपणे कळून चुकलं होतं. या सगळ्या प्रसंगानंतर मी स्वत:ला जरा पडद्याच्या मागेच ठेवलं. मुलाची जबाबदारी पदरात होती पण, दु:ख काही केल्या कमी होत नव्हतं. अर्थात मुलाच्या जबाबदारीमुळे मला पुन्हा काम करणं गरजेचं होतं.”

“मला प्रेक्षक जेव्हा विचारायचे सध्या तुम्ही काय करता? तेव्हा मी अगदीच निरुत्तर होतो. ‘बिग बॉस’मध्ये माझं कुटुंब अनेकांनी पाहिलं होतं…मी बरेच दिवस पडद्यावर नसल्याने काही जणांनी मी या जगात नाहीये असं जाहीर केलं होतं. माझ्याबद्दल खूप वावड्या उठल्या. कोव्हिडच्या काळात माझा आर्थिक संचय संपत होता आणि हळुहळू सगळे पैसे संपले. त्या काळात आपलं कोण आणि परकं कोण हे मला समजलं. एक वेळ अशी आली की माझ्याकडे पैसेच नव्हते. प्रचंड आर्थिक चणचण होती पण, कोणाला सांगणार? माझ्या मुलाने हा सगळा काळ पाहिला याची फार खंत आहे.”

Bhushan Kadu Shocking Story
Bhushan Kadu Shocking Story

“माझ्या सासूबाई, मेहुणा आहेत म्हणून मी मुलाला घरी ठेवून कामासाठी बाहेर पडू शकतो. या काळात काही जणांनी खूप चांगली मदत केली. पण, काही लोकांनी पाठ फिरवली. कसेबसे मी दिवस ढकलत होतो. एके दिवशी ठरवलं की, हे सगळं पाहण्यापेक्षा आपण या जगातून निघून जाऊया…स्वत:ला संपवूया. मी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहायला घेतली पण ती संपेना, रोज मी ती चिठ्ठी लिहायचो आणि असाच एकदा मी बाहेर सामान आणायला गेलो. आमच्या इथे एक छत्र्यांचं दुकान आहे. मी विचार करत होतो छत्री घेऊ नको. दुकानदार बोलला 350 रुपये किंमत आहे. माझं असं झालं अरे पैसे जपून वापरले पाहिजेत. तेव्हा माझ्या मनात विचार आला 22 व्यावसायिक नाटकं, 8-9 सिनेमे, ज्याने सात वर्षे कॉमेडी एक्स्प्रेस केली स्वत:च्या दोन-दोन गाड्या, ड्रायव्हर असं सगळं असलेला माणूस…आज त्या माणसाला 350 रुपयांसाठी विचार करावा लागतो. तो प्रसंग माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हा माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला…ती माणसं म्हणाली, तुमचं काम आम्ही पाहतो. तुम्ही खूप चांगलं काम करता. मला तेव्हा फक्त कामाची गरज होती. आता हळुहळू प्रयत्न करून आणि स्वामीकृपेने मी कामासाठी सज्ज झालोय.” असं भूषण कडूने (Bhushan Kadu) या मुलाखतीत सांगितलंय.

खऱ्या आयुष्यात भूषणने (Bhushan Kadu) अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करत आता तो पुन्हा अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे त्याला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. नक्कीच भूषणला सर्वांनी सपोर्ट करावा अशी आमच्या मराठीजन या वेबसाईट तर्फे आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. त्याचे शो, मालिका, चित्रपट तुम्ही नक्की बघा.. तो एक गुणी अभिनेता आहे. त्यामुळे तुम्हाला तो त्याच्या अभिनयातून निराश नाही करणार हे नक्की..

इतर अशाच प्रकारचे आर्टिकल वाचण्यासाठी किंवा आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमच्या मराठीजन वेबसाईटला किंवा युट्युब चैनेलला भेट द्या.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त