Gautami Patil Viral Video: महाराष्ट्रातील प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil)ही सतत वेग वेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. अनेक वेळा तिच्या कार्यक्रमात राडे होतात. तर काही वेळा तेथील आयोजकांवर गुन्हे देखील दाखल होतात. या अगोदर गौतमी पाटील ही अश्लील डान्स करायची. या प्रकारामुळे खूप वाद झाला होता. पण नंतर गौतमीने माफी मागितल्याने हा वाद मिटला. पण आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे सध्या गौतमीवर खूप जोरदार टीका होत आहे.
गौतमीने लहान मुलींना स्टेजवर नाचवले
सतत वादात असणारी प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील ही आता पुन्हा एकदा तिच्या डान्स कार्यक्रमामुळे चर्चेत आलीय. या वेळेसही तिला सोशल मिडीयावर खूप ट्रोल करण्यात येतंय. नुकतंच एका कार्यक्रमात गौतमी पाटील सोबत स्टेजवर काही लहान मुली सुद्धा डान्स करतांना दिसल्या. या लहान मुली अगदी गौतमी सारखाच डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि गौतमी सुद्धा स्वतः डान्स करत त्यांना प्रोत्साहन देत आहे. गौतमी पाटीलने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टावर शेअर केलाय. हा व्हिडिओ बघून अनेकजण प्रचंड संतापल्याचे दिसत आहे. (Dancer Gautami Patil dancing with Girls in viral video)
गौतमीवर होतेय जोरदार टीका
यात काहींनी गौतमीवर टीका करत म्हटलंय की “अग, तू नाचली ना बास झालं, बाक्की च्या मुलींना नको हे धंदे करायला लावू”, “यांच्या पालकांना भावपूर्ण श्रद्धांजली”, “लहान मुली आहेत एवढी तरी आकल ठेवा”, “कशाला मुलींना तमाशा करायला लावताय”. “तू नाच आणि अजून तुझ्या पुढ 10 तय्यार कर नाचायला. काय माय जरातर लाजावं की. देशाच भविष्य नाचवताना”, “नको यांना या धंद्या ला लावू. शिवकन्या आहेत त्या तुझ्या सारख्या नाचऱ्या कन्या नाही”. असं म्हणत काही सोशल मिडिया युजरने गौतामीवर जोरदार टीका केली आहे.
तसेच गौतमीने असे लहान मुलींना स्टेजवर घेऊन नाचावण्यावर काहींनी त्यांची नाराजी दर्शवत म्हटलंय की “गौतमी ताई तुम्ही नाचा. लहान मुली आहेत हो. विचार करा”, “स्वतःची पोरं काढून नाचव. उगाच भावी पिढीला नादाला लावू नक्का”, “नको पुढची पिढी वाया घालवू”, “तू धंदा मांडलाय बाकीच्या आमच्या बहिणी कशाला खराब करतीय”, “अग माय तू नाचती दुसऱ्या च्या दारी म्हणुन काय दुसऱ्या चा मुलींना नाचवती काय”, “Bai pudhchi pidhi aashi nako kharab karus”, “Mulichya Aai kashya gapp baslyt tumal aashya nachnrya pori havat ka g bayanooo kay ghadvaty tumi lekina”, “Hi shikawn deta ka tumhi mulana wah kuthe chalai mharastr apla”. असं म्हणत अनेकांनी गौतमीच्या या कृत्याविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गौतमी पाटील महाराष्ट्राचा बिहार करणार..
काहींनी तर संस्कार आणि संकृती शिकवत गौतमी पाटीलची चांगलीच शाळा घेतल्याची दिसतेय. यात त्यांनी म्हटलंय की “आदर्श कोनाकडुन घ्यावा हे समजल पाहीजे”, “ही आमची संस्कृती आहे का. लहान लहान मुलींना नाचायला घेऊन गेली आहे. अरे त्यांना माता सावित्री बाई, माता जिजाऊ, माता रमाई, ह्या गोष्टी शिकवा . असले फालतु काही पण करायला लावू नकोस”, “जे दिसते ते चुकीचच आहे. त्या मुलींना स्टेजवर गौतमी घेऊन गेली नसेल त्यामुली स्टेजवर गेल्याच कशा संस्कार या संस्कारी मुली असत्या तर स्टेजवर गेल्याच नसत्या या मुलींचे पालक खाली बसून म्हणत असतील माझी परी कशी नाचतेय.संस्कार नसलेल्या मुली”.
“लहान मुलींना का घेता स्टेज वर आणि ह्या मुलींच्या आईवडिलांना पण कळत नाय का आपण आपल्या मुलांना काय संस्कार देतोय”, “Ya Bai देशाचे भविष्य घडवीत आहेत. नक्की महारष्ट्र चे बिहार होणार”, “आपल्या मुलींना कोणाचा आदर्श द्यावे हे बापाला कळले पाहिजे. ती नाचते तो तिचा पेशा आहे पण आपल्या मुली आपले संस्कार दर्शवतात हे बापांना कळाले पाहिजे . please आपल्या मुली नाचवू नका”, “माझा राजा बाया वाचवणारा होता नाचवणारा नाही. जय शिवराय”. असं म्हणत अनेकांनी गौतमीची चांगलीच शाळा घेतल्याची दिसतेय.
लहान मुलींना स्टेजवर घेऊन नाचावल्याने सध्या डान्सर गौतमी पाटीलवर खूप टीका होत आहे. सोशल मिडीयावर तर तिला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. अनेक ठिकाणी तर गौतमीचे अशा प्रकारे लहान मुलींना स्टेजवर घेऊन नाचणे योग्य की अयोग्य? यावर चर्चा सुरु आहे.