Blinkit delivery in 10 minutes: खाण्या-पिण्याचे पदार्थ किंवा किराणा सामान अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला घरपोच करणारा क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ब्लिंकिट (Blinkit) आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण, आता ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स विभागात सुद्धा पाऊल टाकणार आहे. ‘ब्लिंकिट’चे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी एक्स (ट्विटर)वर एक पोस्ट शेअर केली आहे.
आता ‘ब्लिंकिट’द्वारे (Blinkit) तुम्ही लॅपटॉप, मॉनिटर्स, प्रिंटर आणि बरेच काही थेट ऑर्डर करू शकणार आहात आणि फक्त १० मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या वस्तू घरपोच डिलिव्हर केल्या जाणार आहेत.
यासाठी ‘ब्लिंकिट’ने काही आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड्सशी पार्टनरशिप केल्याचे समजत आहे, ज्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अगदी सहज खरेदी करणे शक्य होणार आहे. सध्या Blinkit तुम्हाला एचपी कंपनीचे लॅपटॉप, लेनोवो, Zebronics, MSI वरून मॉनिटर्स, कॅनॉन व एचपीवरून प्रिंटर ऑफर करत आहे. भविष्यात Epson कॅटरिंजेस (Epson cartridges)देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रमुख शहरांमध्ये सुरू
‘ब्लिंकिट’चे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी सांगितले की, ही सेवा सध्या दिल्ली एनसीआर, पुणे, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनऊ या प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. मोठ्या वस्तूंसाठी डिलिव्हरी विशेषत: ब्लिंकिटच्या खास लार्ज-ऑर्डर फ्लीटद्वारे हाताळली जाईल. त्याचप्रमाणे कंपनीने आपल्या पोर्टफोलिओचा आणखी विस्तार करण्याच्या योजनांचे संकेत दिले आहेत आणि लवकरच अधिक ब्रॅण्ड्स आणि उत्पादने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.
You can now get laptops, monitors, printers and more delivered in 10 minutes!
— Albinder Dhindsa (@albinder) January 9, 2025
We're expanding our electronics range to cover more use cases and have partnered up with leading brands in this category. We've got 👇
• Laptops from HP
• Monitors from Lenovo, Zebronics and MSI
•… pic.twitter.com/23AQKZyIKZ
लॅपटॉप, मॉनिटर्स, प्रिंटर यांसारखी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फक्त १० मिनिटांत वितरित करण्याची ‘ब्लिंकिट’ची नवीन सेवा ग्राहकांसाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकते. पण, लहान स्टोअर्स आणि अधिकृत डीलर्सना यांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. या मॉडेलसह, ब्लिंकिट व्यापाऱ्यांना दूर सारून ग्राहकांना स्टोअरला भेट देण्याच्या त्रासाशिवाय स्पर्धात्मक किमतींत उत्पादने विकत घेण्याची सुविधा मिळवून देत आहे.
गेल्या आठवड्यात, Blinkit प्लॅटफॉर्मने १० मिनिटांची रुग्णवाहिका सेवा सुरू केली, जी गुरुग्राममध्ये २ जानेवारीपासून सुरू झाली आहे. परिसरातील युजर्स आता ब्लिंकिट ॲपद्वारे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका बुक करू शकतात. ब्लिंकिट (Blinkit) १० मिनिटांत तुमच्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी सक्षम असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी एक महत्त्वपूर्ण सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम येत्या काही महिन्यांत इतर शहरांमध्ये विस्तारण्याची अपेक्षा आहे. त्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की, रुग्णवाहिका सेवेसाठी ब्लिंकिटच्या क्विक कॉमर्स कंपनीला देशाच्या कायद्यांचे पालन करावे लागेल. त्याशिवाय इतर कायदेशीर बाबींचीही योग्य काळजी घेतली गेली पाहिजे.
इतर अधिक माहितीसाठी आपल्या मराठीजन या वेबसाईटला फॉलो करा, तसेच आपले App डाउनलोड करा – Download App