बिग बॉस मराठी 5 चे होस्ट असणार रितेश देशमुख | Bigg Boss Marathi 5 | Riteish Deshmukh

Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi 5: महाराष्ट्रात tv वरील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीजनची घोषणा करण्यात आली आहे. या 5 व्या सीजनची प्रेक्षकही खूप आतुरतेने वाट बघत होते. आता नुकतंच कलर्स मराठीने हा सीजन लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे. पण यात कलर्स मराठीने प्रेक्षकांना सुरुवातीलाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ते म्हणजे आता महेश मांजरेकर हे बिग बॉस मराठी चे होस्ट असणार नाही. यावेळी होस्ट म्हणून महेश मांजरेकरांच्या ऐवजी एका नव्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

कलर्स मराठी चैनेल वरून शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये यंदा Bigg Boss Marathi 5 चं होस्टिंग कोण करणार त्या अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. यावेळी ‘बिग बॉस मराठी’चं होस्टिंग बॉलीवूडचा स्टार आणि प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. यामुळे प्रेक्षकांमधेही हा शो बघण्याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. कलर्स मराठी आणि जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शोची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओखाली “मराठी मनोरंजनाचा ‘BIGG BOSS’ सर्वांना ‘वेड’ लावायला येतोय…’लयभारी’ होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख!” असं कॅप्शन दिलं आहे.

तर बिग बॉस मराठीत महेश मांजरेकरांच्या जागेवर आता रितेश देशमुख चे होस्टिंग बघण्यासाठी तुम्हीही उत्सुक आहात का? ते येथे कमेंट करून नक्की सांगा.

इतर अशाच प्रकारचे आर्टिकल वाचण्यासाठी किंवा आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमच्या मराठीजन वेबसाईटला किंवा युट्युब चैनेलला भेट द्या.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top