Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui Life Story : बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीची जीवन कहाणी

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui Life Story

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui Life Story: बिग बॉस 17 (Bigg Boss 17) च्या ग्रँड फिनालेत या सीजनचा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा ठरला आहे. तर अभिषेक कुमार (Abhishek Kumar) हा उपविजेता ठरला आहे. (Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui life story)

मुनव्वर फारुकी विजयी घोषित

मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नार चोप्रा (mannara chopra) हे बिग बॉस 17 चे टॉप 3 स्पर्धक ठरले. यात अंकिता लोखंडे ही top 3 मध्ये पोहोचू शकली नाही. याबद्दल सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. अंकिता लोखंडे ही चौथ्या क्रमांकावर बाहेर पडली. त्यांनतर मन्नारा चोप्रा ही तिसऱ्या क्रमांकावर बाहेर पडली. यांनतर मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार हे Bigg Boss 17 चे top 2 स्पर्धक ठरले.

मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार या top 2 पैकी सलमान खानने मुनव्वर फारुकी याचा हात वर करत त्याला विजेता म्हणून घोषित केले. बिग बॉस 17 च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सलमान खानने मुनव्वर फारुकीला बिग बॉस 17 ची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत. यासोबतच त्याला एक कार देखील बक्षीस म्हणून मिळाली आहे.

मुनव्वर फारुकी बद्दल माहिती (Who is Munawar Faruqui)

मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो त्याच्या विनोदी कॉमेडीने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. पण अनेक वेळा मुनव्वर हा त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये हिंदू देवी देवतांवर केलेल्या विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. यामुळे त्याला जेल मधेही जावे लागले होते.

मुनव्वरच्या आईने केली होती आत्महत्या

मुनव्वर फारुकीने लॉकअप या शोमध्ये सांगितलं होतं की त्याच्या आईचा मृत्यू अॅसिड प्यायल्यानं झाला होता. यावेळी त्याने असेही सांगितले होते की “जानेवारी 2007 मध्ये ही घटना घडली होती. माझ्या आजींनं मला सांगितलं होतं की माझ्या आईची तब्येत ठिक नाहिये. पोटादुखीमुळे मी माझ्या आईला ओरडताना पाहिलं होतं. मी माझ्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तेव्हा कळालं की माझ्या आईने अॅसिड प्यायलं होते. तेव्हा मी तिचा हात पकडला होता. डॉक्टर मला म्हणाले की त्यांचा हात सोडून दे, आता त्यांचे निधन झाले आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या आईनं सात ते आठ दिवस जेवण देखील केले नव्हते.” अशी दु:खद कहाणी मुनव्वर फारुकी याने त्याच्या आई बद्दल सांगितली होती.

मुनव्वर ‘लॉक-अप’ चाही विजेता

मुनव्वर फारुकीने अभिनेत्री कंगना रानौतचा ‘लॉक-अप’ हा शो सुद्धा जिंकला होता. या शोमुळे मुनव्वरला खूप लोकप्रियता मिळाली. लॉक-अप शो जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी, 20 लाख रुपयांचे बक्षीस आणि एक गाडीही मिळाली होती. तसेच त्याला इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली होती. त्याला या शो मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानेच त्याला बिग बॉस या शो साठीही विचारणा झाली.

मुनव्वर विजेता पदाचा प्रमुख दावेदार

Bigg Boss 17 हा शो सुरु झाल्यापासूनच मुनव्वर फारुकीला विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानले जात होते. अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा याही मुनव्वरला टफ फाईट देत होते. पण आता मुनव्वर फारुकी हाच या शो चा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आणि वोट मिळाले. आता तो विजेता झाल्याने त्याचे चाहतेही सोशल मिडिया द्वारे याचा आंनद साजरा करत आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top