Bigg Boss 17 Finale: बिग बॉस 17 हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ आता जाहीर झाली आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खानने होस्ट केलेल्या या शोचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. (Bigg Boss 17 finale Mannara Chopra will win this show)
अंतिम टॉप 5 स्पर्धक
या शो चे टॉप 5 स्पर्धक कोणते हे आता जाहीर झाले आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारूकी, मन्नारा चोपड़ा, अभिषेक कुमार आणि अरुण मैशेट्टी हे या 17 व्या सीजनचे अंतिम टॉप 5 स्पर्धक आहे. जसजसा फिनाले जवळ येत आहे तसतसे विजेता कोण होणार? आणि बक्षीसाची रक्कम किती असणार याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत. असंही म्हटलं जातंय की विजेत्याला मोठी रक्कम मिळू शकते, जी 30 ते 40 लाखांच्या दरम्यान असेल.
हे असतील टॉप 3 स्पर्धक
तर आता बिग बॉस 17 ची ट्रॉफी कोण जिंकणार? याची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकजण त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करत तोच विजेता होणार असं सोशल मिडीयावर म्हणत आहे. पण या सर्व चर्चांपैकी ज्या तीन नावांची सर्वाधिक चर्चा होत आहे ते तीन म्हणजे अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्रा. हे तिघे बिग बॉस 17 चे टॉप 3 स्पर्धक असू शकतात. या तिघांना वोटिंग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.

मन्नारा चोप्रा विजेतेपदाची प्रमुख दावेदार
अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्रा या तिघांपैकी मन्नारा चोप्रा ही बिग बॉस 17 ची विजेतेपदाची प्रमुख दावेदार मानली जात आहे. कारण या शोमधील मन्नाराचा जर्नी व्हिडिओ सर्वाधिक मोठा होता. दरवर्षी बिग बॉस मध्ये ज्यांचा जर्नी व्हिडीओ सर्वात मोठा असतो त्यापैकी अनेकजण विजेते झाले आहे. बिग बॉस मध्ये सिद्धार्थ शुक्ला, रुबीना दिलैक, शिव ठाकरे यांचा जर्नी व्हिडिओ सर्वाधिक मोठा होता. यापैकी सिद्धार्थ शुक्ला आणि रुबीना दिलैक हे बिग बॉसचे विजेते झाले आहेत. पण शिव ठाकरे विजेता होऊ शकला नाही. तो चांगलं खेळूनही उपविजेता ठरला, आणि ज्याला नीट खेळता ही आले नाही त्या एम सी स्टॅन ला सर्वाधिक फॉलोअर्स आणि ऑनलाईन वोटिंग च्या आधारावर या शोचा विजेता बनवण्यात आले.
पण बिग बॉस च्या या 17 व्या सीजन मध्ये मन्नारा चोप्राचे खेळणे आणि तिला मिळणारा प्रेक्षकांचा सपोर्ट बघता ती या शो ची विजेता होण्याची जास्त शक्यता आहे.