Bigg Boss 17: सध्या बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) होस्ट असलेल्या बिग बॉसचा हा 17 वा सिझन सुरु आहे. हा सीजन सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तर या सीजन मध्ये सामील असलेल्या स्पर्धकांवर बाहेर खूप टीका होतांना सुद्धा दिसत आहे. नुकतंच अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) व विकी जैन (Vicky Jain) यांच्यात झालेलं भांडण चर्चेचा विषय ठरला आहे.
बिग बॉसच्या घरात पती-पत्नीत सतत वाद
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि उद्योगपती विकी जैन यांनी डिसेंबर 2021 मध्ये लग्न केले होते. बॉसच्या या 17व्या सीजन मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ही तिचा पती विकी जैन सोबत सहभागी झाली. बिग बॉसच्या घराबाहेर हे पती-पत्नी खूप चांगले राहत होते. यांच्यात बाहेर कधी वाद झाल्याचे ऐकले नाही. पण जेव्हापासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे पती-पत्नी बिग बॉसच्या घरात आले आहे तेव्हापासून यांच्यात वारंवार भांडण होत असल्याचे दिसतंय. एकदा तर अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली होती. आता तर नुकतंच झालेल्या भांडणात अंकिताने तिचा पती विकीकडे डायरेक्ट घटस्फोट मागितलाय. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात आजपर्यंत आपण अनेक जोड्या जुळल्याचे आपण बघितले आहे, पण आता हे कपल बिग बॉसच्या घरातच वेगळे होणार का? असाही सर्वांना प्रश्न पडलाय.
या कारणामुळे अंकिताने मागितला घटस्फोट
बिग बॉसच्या घरात नुकतंच आयशा खानने विकीला त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारले आणि विकी जैनने तिला याबद्दल उत्तर देत “विवाहित पुरुषांना खुप त्रास असतो” असं तो लग्नाबद्दल आपलं मत मांडतो. पण विकीचं हे बोलणं हे ऐकल्यानंतर अंकिता त्याच्यावर खूप चिडते. ती विकीला असं बोलण्या मागचं कारण विचारते. तर यावर विकी म्हणाला की “मला कसं वाटत आहे हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित पुरुष कोणत्या परिस्थितीतून जात असतो, काय सहन करत असतो, हे ते कधीच बोलू शकत नाहीत”. असं विकीने म्हटल्यानंतर अंकिता लोखंडे प्रचंड चिडते.
यानंतर रागात अंकिता ही विकीला म्हणते की “तुला जर इतका त्रास होतोय तर मग तू माझ्यासोबत का आहेस? घटस्फोट घे, मला तुझ्यासोबत घरी परत जायचं नाही.” असं अंकिता म्हणते. त्यामुळेच आता बिग बॉसच्या घरात यांचं नातं तुटतं की काय असं सर्वच प्रेक्षकांना वाटू लागलंय. काहींनी तर नातं वाचवण्यासाठी त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देखील दिला आहे. काही प्रेक्षकांना तर यांचं भांडण खोटं वाटतंय. त्याचं म्हणणं आहे की हे नवरा बायको फक्त फुटेज साठी भांडण करताय.
काही प्रेक्षकांनी तर असंही म्हटलंय की अंकिता लोखंडेला बिग बॉसच्या घरात नीट खेळता येत नाही. त्याऐवजी ती स्वतःची इमेज खराब करून घेतेय. तसेच अंकिता लोखंडे हि बिग बॉसच्या घरात वारंवार अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आठवण काढत असते. अभिनेता सुशांत अगोदर अंकिताचा बॉयफ्रेंड होता. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर सुद्धा अंकिता खूप चर्चेत होती. पण या अगोदरच काही वर्षांपूर्वी सुशांतने अंकिता सोबत ब्रेकअप केलं होतं. आणि अंकिताचे विकी जैन सोबत लग्न जमलं होतं. तरीही अंकिता सुशांत साठी खूप रडत होती. हे सर्व बघून अनेकांनी ती मिडिया समोर ड्रामा करत असल्याचे म्हटले होते. तसेच काहींनी तर अंकिता ही सुशांतची विधवा असल्याचे नाटक करतेय असंही तिच्यावर टीका करत म्हटलं होतं.
अंकिता आणि ऐश्वर्या शर्माचे फुटेजसाठी भांडण
तसंच आताही बिग बॉसच्या घरात सुशांत सिंह राजपूत च्या नावाने अंकिता प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप अनेक प्रेक्षकांनी केलंय. तर काहींनी असंही म्हटलंय की बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी प्रेक्षकांचे वोट मिळावे यासाठी अंकिता सतत सुशांत सिंह राजपूत चे नाव घेऊन इमोशनल ड्रामा करत असते. यासोबत फुटेजसाठी तिने अगोदरच विकी सोबत भांडणाचा प्लॅन केला असावा असाही काहींनी अंदाज व्यक्त केलंय. सध्या बिग बॉसच्या घरात अंकिता आणि ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) या दोघी केवळ चर्चेत राहण्यासाठी मुद्दामहून भांडत असतात असंही अनके प्रेक्षकांनी म्हटलंय.
तर अशा काही कारणांमुळे अंकिता लोखंडे ही सध्या खूप चर्चेत आहे. आणि जो चर्चेत असतो तोच बिग बॉसच्या घरात टिकतो. त्यामुळे या सर्व वादाचा अंकिताला बिग बॉसच्या घरात फायदा होतोय असंच म्हणावं लागेल.