प्रसिद्ध मराठी उद्योगपती अतुल बेडेकर यांचे निधन | Atul Bedekar

Atul Bedekar

बेडेकर आणि सन्स उद्योग उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणारे प्रयोगशील उद्योजक तसेच व्ही. पी. बेडेकर आणि सन्स उद्योग समूहाचे संचालक अतुल बेडेकर यांचे गंभीर आजारामुळे शुक्रवारी वयाच्या 56 व्या वर्षी निधन झाले.

लोणची, पापड आणि मसाल्यांचा बेडेकर ब्रँड आज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात फेमस झाला आहे. बेडेकर आणि सन्स हा उद्योग दिवंगत उद्योगपती व्ही पी बेडेकर यांनी 1910 मध्ये गिरगाव येथील एका किराणा दुकाना पासून हा व्यवसाय सुरू केला होता. पुढे हा व्यवसाय प्रचंड वाढला आणि जनतेची त्यांचा प्रोडक्ट्सला खूप पसंती मिळाली, त्यामुळे आताही 100 वर्षांहून अधिक काळ लोणची, पापड आणि मसाले या क्षेत्रात बेडेकर कार्यरत आहेत. आणि आजही त्यांच्या उत्पादनांना तेवढीच पसंती मिळतेय हे विशेष आहे.

सध्या बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर हे या उद्योग समूहाची धुरा अत्यंत यशस्वीरित्या सांभाळत होते. पण गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. आणि त्यातच आता त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. अतुल बेडेकर यांच्या निधनानं मराठी उद्योग जगतातील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

आज गिरगावातील बेडेकर सदन येथून अंत्ययात्रा निघणार असून मरिन ड्राइव्ह येथील चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top