Arvind Jagtap on Raj Thackeray Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी (5 जुलै) रोजी 20 वर्षांनी एकत्र आलेले पाहायला मिळाले. दोन्ही नेते मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले. विशेष म्हणजे सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी यावेळी विजयी सभा घेतली. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, असं कित्येक लोकांनी यापूर्वी देखील बोलून दाखवलं होतं. हा क्षण पाहाण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला 20 वर्षे वाट पाहावी लागली.
महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शिक्षणात सुरुवातीला हिंदी भाषा सक्ती केली होती. मात्र, चारीबाजूंनी विरोध झाल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या शासन निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील सरकारच्या या निर्णयास विरोध करण्यास सुरुवात केली.
सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांचा विरोध डावलून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा विचार ठेवल्यानंतर राज ठाकरेंनी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चात एकत्र येणार हे देखील ठरलं. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा घुसडण्याचा निर्णय मागे घेतला. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, सरकारने निर्णय रद्द केल्यानंतर मोर्चा ऐवजी विजयी सभा घेण्याचं ठरलं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेले पाहायला मिळाले.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर लेखक अरविंद जगताप यांनीही त्यांची प्रतिक्रिया देत सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. अरविंद जगताप त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात, “भाऊ वेगळे झाले की शेताचा बांध तुटतो. भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो. भाऊ एक झाले की शहराला बळ येतं . गावाला तर येणारच. एक व्हायचं. गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. एकत्र येऊन बघा.” असं लेखक अरविंद जगताप यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये म्हटलंय.
भाऊ वेगळे झाले की शेताचा बांध तुटतो .
— Arvind Jagtap (@arvindj3) July 5, 2025
भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो.
भाऊ एक झाले की शहराला बळ येतं . गावाला तर येणारच. एक व्हायचं.
गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. एकत्र येऊन बघा.