Usha Naik: जेष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाईक यांना नुकतंच 2022 या वर्षासाठी व्ही. शांताराण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अभिनेत्री उषा नाईक या मराठी चित्रपट क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करत आहे. यात त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि यानंतर त्या मालिका क्षेत्राकडे वळल्या आहे. (Actress Usha Naik’s revelation – I was treated with a lot of injustice)
नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्री उषा नाईक यांनी चित्रपट क्षेत्रात काम करत असताना माझ्यावर भरपूर अन्याय झाले होते असा खुलासा केला आहे. त्यांनी नुकतंच इट्स मज्जा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यात त्या म्हणाल्या की “चित्रपट क्षेत्रात काम करत असताना माझ्यावर भरपूर अन्याय झाले होते. पण ते सर्व माझ्यावरचे अन्याय या ‘एक हजारच्या नोट’ने भरून काढले. जवळजवळ पंधरा ते सोळा अवॉर्ड मला मिळाले. काम करणं हे मला चांगलं माहित होतं. आता अवॉर्ड मिळणं न मिळणं हा काही नशिबाचा भाग नाही तर काही लोकांच्या मर्जीचा भाग आहे. हे मला नंतर नंतर कळत गेलं.” असं उषा नाईक यांनी म्हटले आहे.
यासोबतच जेष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाईक यांनी त्यांच्यामुळेच मराठी कलाकारांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळणं बंद झालं होतं आणि आता अभिनेता रितेश देशमुख यांच्यामुळे ते पुन्हा सुरु झाले असा खुलासा अभिनेत्री उषा नाईक यांनी या मुलाखतीत केला आहे. यात त्यांनी म्हटलंय की “मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, पण तो अवॉर्ड घ्यायला मी गेले नाही. माझ्या मुलाचे उपचार सुरु होते त्यामुळे डॉक्टरकडे धावा सुरुचं होत्या. आणि त्यामुळे हे सर्व सोडून तिथे जाऊन अवॉर्ड घेणं मला योग्य नाही वाटलं. त्यावेळी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मराठी कलाकारांना घेणं बंद केलं. आम्ही अवॉर्ड देतो पण ही मराठी कलाकार मंडळी अवॉर्ड घ्यायला येत नाहीत. यांना या अवॉर्डची काळजी नसेल तर जाऊदे, असं तेव्हा बोललं जायचं.”
“तेव्हापासून हा अवॉर्ड देणं त्यांनी बंद केलं आणि त्यानंतर पुन्हा हा फिल्मफेअर अवॉर्ड देण्यास रितेश देशमुख सरांनी स्वतंत्रपणे सुरु केलं. तेव्हा मी या पुरस्कार सोहळ्याला गेले होते त्यावेळी तिथेही मी बोलून दाखवलं की, हे फिल्मफेअर अवॉर्ड माझ्यामुळे बंद झालं होतं, ते पुन्हा एकदा रितेश देशमुख सरांनी सुरु केलं.” असा खुलासा जेष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाईक यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे.
This webpage is outstanding. The site owner’s passion is evident in the excellent content. I’m in awe and anticipate reading more amazing pieces like this one.