Poonam Pandey: धक्कादायक! सर्वायकल कॅन्सरमुळे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी अभिनेत्री पूनम पांडेचे निधन

Poonam Pandey passed away

Poonam Pandey: आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे हिचे सर्वायकल कॅन्सर मुळे निधन झाले आहे. (Shocking! Actress Poonam Pandey passed away at the age of just 32 due to cervical cancer)

सर्वायकल कॅन्सर धोकादायक

काही दिवसांपूर्वीच आम्ही एका आर्टिकल मध्ये सांगितलं होतं की सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) म्हणजेच गर्भशयाच्या मुखाचा कॅन्सर हा किती धोकादायक आजार आहे, यामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतोय. तसेच हा कॅन्सर कसा होतो? तो होऊ नये यासाठी सर्व मुलींनी आणि महिलांनी HPV ही लस नक्की घ्यावी. याबद्दल मराठी अभिनेत्री अक्षया देवधर हिने शेअर केलेली माहिती आम्ही त्या आर्टिकल मध्ये दिलेली होती. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेता हार्दिक जोशी याच्या वहिनींचे निधन सुद्धा सर्वायकल कॅन्सर मुळेच झाले होते. याबद्दलही आपण माहिती त्याच आर्टिकल मध्ये बघितली आहे. त्या आर्टिकलची लिंक खाली दिलेली आहे.

अभिनेत्री पूनम पांडेचे निधन

त्यानंतर आता सर्वायकल कॅन्सर मुळे मृत्यू होण्याचे अजून एक उदाहरण समोर आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे सर्वायकल कॅन्सर मुळे आज सकाळी निधन झाल्याची माहिती मिळत आहे. पूनम पांडेच्या ऑफिशियल instagram पेजवर या संदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे. पूनमच्या परिवाराने ही पोस्ट करत तिच्या निधनाची बातमी दिल्याची माहिती मिळतेय.

वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी पूनमचे या गंभीर आजाराने निधन झाले आहे. तिच्या अचानक अशा प्रकारे निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कारण अभिनेत्री पूनम पांडेला सर्वायकल कॅन्सर असल्याची माहिती फिल्म इंडस्ट्रीज मध्ये इतर कोणालाही नव्हती.

पूनमची एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख

अभिनेत्री पूनम पांडेने अनेक बॉलीवूड चित्रपटांत काम केले होते. पूनमला एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ती सोशल मिडीयावर नेहमी तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ टाकत असल्याने तिची खूप चर्चा होत असते. काही महिन्यांपूर्वी ती अभिनेत्री कंगना रानौत होस्ट असलेल्या ‘लॉक-अप’ या शो मध्ये झळकली होती. या शो मुळे ती खूप चर्चेत होती.

Actress Poonam Pandey passed away
Actress Poonam Pandey passed away

काही दिवसांपूर्वी एका फोटोशूटच्या सेटवर तिची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती मिळतेय. पण आता अभिनेत्री पुनमचे सर्वायकल कॅन्सरमुळे निधन झाले आहे. अभिनेत्री पूनम पांडे हिला भावपूर्ण श्रद्धांजली.

मुलींना मोफत लस देण्याची घोषणा

तर तुम्ही महिलांनी किंवा मुलींनी अजूनही सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून HPV लस घेतली नसेल. तर ती नक्की घ्या. आता तर सरकारने 9 ते 14 वर्ष वय असणाऱ्या मुलींना ही मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. तसेच ही लस कोणत्या वयापर्यंत घेऊ शकतो. याबद्दलची माहिती आमच्या “HPV Vaccine: अभिनेत्री अक्षया देवधरने सर्व मुलींना ही लस घेण्याची केली विनंती – काय आहे Cervical Cancer?” या आर्टिकल मध्ये नक्की बघा. सर्व महिला आणि मुलींनी HPV लस घ्या आणि सर्वायकल कॅन्सर पासून सुरक्षित राहा.

poonam pandey, lock up actress, bollywood, bollywood actress, cervical cancer, hpv vaccine, free hpv vaccine for girls,

Share this Post:

1 thought on “Poonam Pandey: धक्कादायक! सर्वायकल कॅन्सरमुळे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी अभिनेत्री पूनम पांडेचे निधन”

Leave a Comment

Scroll to Top