नुकताच झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्री अदिती सारंगधरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला पण यावेळी अदितीच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले,
तिने काळा आणि केशरी रंगाचा पैठणीचा ड्रेस घातला होता. या ड्रेससोबत आदितीने पैठणीची बॅग, पैठणीचे शूज आणि डोक्यालाही पैठणीचा क्लच देखील लावाला होता. तिला हा लुक खूप ग्लॅमरस असला तरी प्रेक्षकांना मात्र तिचा हा लुक आवडला नाही.
अदिती सारंगधरच्या या पैठणी ड्रेसच्या फोटोखाली प्रेक्षकांनी खूप साऱ्या कमेंट करत आदितीला या ड्रेसवरून प्रचंड ट्रोल केले आहे. यात एका सोशल मिडिया युजरने म्हटले आहे की “पैठणीची ऐशीतैशी — हे मराठी सिनेसृष्टीवाले फॅशनच्या नावाखाली मराठी संस्कृतीची वाट लावत आहेत. त्यांच्या टुकार सिनेमांबद्दल कोणी काही बोललेलं तर! 2-4 बरे सिनेमे आहेत त्याचीच कॅसेट वाजवतात. विशेष म्हणजे यांना 100 वर्षाचा अनुभव आहे 😪.
instagram युजरने तर आदितीवर खूप मोठ्या प्रमाणात टीका केली आहे, यात एका युजरने म्हटलंय की “तुम्ही खूप चांगल्या कलाकार आहात… We respect u… But, पैठणी ही आपल्या राज्याची शान आहे… त्याचा असा विकृतीकारण नका करू… तुमच्या कपडे घालण्यावर काही आक्षेप नाही ते आपले व्यक्तीस्वातंत्र्य आहे पण एक कलाकार म्हणून तुमच्याकडून पैठणी चा असा अनादर अपॆक्षित नाही…”
अजून एका युजरने म्हटलं आहे की “देवा कुठे नेऊन ठेवलास महाराष्ट्र माझा 👏 ड्रेस तोकडा झाला 😢पैठणी महाराष्ट्राची शान आहे आदर करा प्लीज स्कीन शो कशाला पैठणी मध्ये ? त्या पेक्षा १ मीटर पैठणी चा कापड जास्त घ्यायचा ना ! कधी कुणाला वाईट कमेंट नाही करत पण हे बघवत नाही😢.
पुढे एका युजरने विनोदी टीका करत म्हटलंय की “अति… अति होतंय… किती तो अन्याय पैठणी वर 😂😂”. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय की “बाई हा काय प्रकार 😂 घाई घाईत लहान मुलीचा ड्रेस घातला वाटत😂”. अजून एका युजरने म्हटलंय की “किळस वाटली, फॅशन च्या नावा खाली काही करतात , शोभले तर पाहिजे😮😮😮”.
अशा प्रकारे खूप साऱ्या युजरने आदितीवर टीका केली आहे, त्याबद्दलचे कमेंट खालील फोटोंमध्ये दाखवले आहे.


अभिनेत्री अदिती सारंगधर ही सध्या तिच्या ड्रेसमुळे खूप चर्चेत आली आहे. तिने पैठणीचा हा ड्रेस घातल्याने तीचा लुक ग्लॅमरस दिसत असला तरी पैठणी साडीला महाराष्ट्राची शान समजले जाते आणि त्याच पैठणीचा तिने असा ड्रेस घातल्याने असंख्य मराठी प्रेक्षकांना हे आवडले नाही, त्यामुळे त्यांनी अदितीला खूप ट्रोल केले आहे.