Shashank Ketkar on Politics: आपल्या भारत देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकजण कोणाला तिकीट मिळणार? कोण निवडून येणार? याचीच चर्चा करत आहे. त्यातच आता मराठी अभिनेता शशांक केतकर याने तारांगण या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याचे सध्याच्या राजकारणाविषयी मत मांडले आहे. (Marathi Actor Shashank Ketkar experess his own opinion on Lok Sabha Election 2024, BJP, Sharad Pawar and Maharashtra Politics.)
अभिनेता शशांक केतकर याने या मुलाखतीत भाजप पक्षाचे समर्थन करत ही लोकसभा निवडणूक तेच जिंकणार असल्याचे म्हटले आहे. यात शशांक केतकर म्हणाला आहे की “राज्यात काय घडतंय यावर माझं लक्ष आहे. कारण, कलाकार होण्याआधी मी एक नागरिक आहे. मी एक माणूस आहे. रस्त्यावर चालताना, फिरताना, भाजी घेताना, शूटिंग करताना मला अनेकदा प्रॉब्लेम दिसतात. त्याबरोबरच देशात होणारी विकासाची कामंही दिसत असतात. ज्यांनी चांगली कामं केलीत, त्यांचं मी कौतुक करतो. इतकी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाचा वेग न थांबवता विकास करणं ही अवघड गोष्ट आहे.”
“राज्यात जे काही सुरू आहे. ते काही पहिल्यांदा घडत नाहीये. याआधीही अनेकदा या गोष्टी घडलेल्या आहेत. मी एक व्हिडिओ पाहिला, त्यात असं म्हटलं होतं की अमित शहांचा मुलगा बीसीसीआयचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो? त्याने कुठे क्रिकेट खेळलंय. मग माननीय शरद पवारसुद्धा आयसीसीचे अध्यक्ष होते. ते तरी कुठे क्रिकेट खेळले होते. ज्ञान असणाऱ्या आणि त्यासाठी लागणारा बिझनेस आणू शकणाऱ्या योग्य व्यक्तीला त्या त्या जागी बसवलं जातं. हे अनेकदा घडलेलं आहे.”
“सध्याचं राजकारण स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचं सुरू आहे. यात आपण न पडलेलंच बरं, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर सध्या भाजपाला या सगळ्याची गरज नाही. ते तसंही जिंकणार आहेत. हे माझं प्रांजळ मत आहे. पण, जिथे आपण जिंकून येऊ की नाही अशी शंका असेल तिथला उमेदवार आपल्या पक्षात घेणं हे सगळेच करत आलेले आहेत. जनतेची प्रगती होणार असेल. तर तुम्ही कोणालाही पक्षात घ्या आणि काढा. मात्र देश चांगल्या पद्धतीने घडवा.” असं अभिनेता शशांक केतकर याने या मुलाखतीत म्हटले आहे. एक प्रकारे त्याने भाजपचे समर्थन करत तेच निवडणूक जिंकणार असल्याचे म्हटले आहे.
अभिनेता शशांक केतकर याने होणार सून मी ह्या घरची, सुखाच्या सरींनी हे मन बावरे, पाहिले न मी तुला या काही गाजलेल्या मालिकांत त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. होणार सून मी ह्या घरची या मालीकेतीलच अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत शशांकची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी बनली होती. पण पुढे खऱ्या आयुष्यात सुद्धा शशांक आणि तेजश्री प्रेमात पडले त्यांनी खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्न केले होते. पण त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि काही दिवसांतच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर आता शशांकने दुसरे लग्न केले आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आता ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे. तर अभिनेता शशांक केतकर हा ‘मुरांबा’ या मालिकेत झळकत आहे.