Piyush Suruchi Marriage: तिसऱ्या लग्नामुळे अभिनेत्री सुरुची आणि अभिनेता पियुषवर प्रेक्षकांची जोरदार टीका

Suruchi Adarkar Marriage 1

Piyush Suruchi Marriage: अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांचे नुकतंच लग्न झालं आहे. पण हे लग्न सध्या चर्चेचा विषय बनलय. अनेक प्रेक्षकांनी तर यांच्या या लग्नावरच सडकून टीका केलीय. मग अभिनेत्री सुरुची आणि अभिनेता पियुष यांच्या या लग्नावर टीका का होतेय? यामागचे कारण जाणून घेऊया.

अभिनेता पियुषचे हे पहिले लग्न नाही

अभिनेत्री सुरुची अडारकर हिचे जरी हे पहिलेच लग्न असले तरी अभिनेता पियुष रानडे याचे हे पहिले लग्न नाही. लग्न व घटस्फोट या कारणामुळे अभिनेता पियुष हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. या अगोदर त्याचे दोन अभिनेत्रीं सोबत लग्न आणि घटस्फोट झालेय. आणि त्यानंतर आता हे त्याचे तिसऱ्या अभिनेत्री सोबत लग्न झालेय. यामुळेच अनेक प्रेक्षकांनी अभिनेत्री सुरुची आणि अभिनेता पियुष या दोघांवरही जोरदार टीका केली आहे.

कोण विश्वास कसा ठेवू शकतं?

यात काहींनी म्हटलंय की “अरे हा किती लग्न करणार?”, तर “अरे पण दोन दोन लग्न मोडलेल्या मुलावर विश्वास ठेवून लग्न कशा करतात या मुली”, “अगं तुला दुसरा कोणी भेटला नाही का लग्न करायला हाच भेटला तुला”, “काय पण याचे आधीच दोन लग्न झाले आहेत. काय मूर्खपणा आहे. दोन लग्न मोडल्यानंतर कोण विश्वास कसा ठेवू शकतं?” असं म्हणत काहींनी अभिनेत्री सुरुची अडारकरवर सुद्धा खूप टीका केली आहे.

पियुषची पहिली पत्नी अभिनेत्री शाल्मली

अभिनेता पियुष रानडेचं हे तिसरं लग्न आहे. पियुषची याआधी दोन लग्न असफल ठरली आहेत. 2010 साली पियुषने अभिनेत्री शाल्मली टोळ्ये सोबत लग्न केले होते. शाल्मली ही अभिनेत्री असून ती एक स्टायलिस्टही आहे. शाल्मली व पियुषचा संसार दिर्घकाळ टिकला नाही. लग्नाला अवघे चार वर्ष होताच, म्हणजेच 2014 साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

पियुषची दुसरी पत्नी अभिनेत्री मयुरी

त्यांनतर ‘अस्मिता’ ही मालिका करत असताना पियुषची ओळख अभिनेत्री मयुरी वाघ सोबत झाली. मालिकेत एकत्र काम करता करता पियुष आणि मयुरी हे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्ष मालिकेत एकत्र काम केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1 फेब्रुवारी 2016 रोजी दोघांनी लग्न केलं. मयुरीचं हे पहिलं लग्न होतं तर पियुषचं हे दुसरं लग्न होतं. पण पियुषचे हे लग्न सुद्धा टिकले नाही.

Actor Piyush Ranade with his Ex. wife Shalmalee Tolye and Mayuri Wagh
Actor Piyush Ranade with his Ex. wife Actress Shalmalee Tolye and Mayuri Wagh

पियुषचे तिसऱ्यांदा प्रेम आणि लग्न

आता अभिनेत्री सुरुची अडारकर सोबत अभिनेता पियुष रानडेने तिसऱ्यांदा लग्न केलंय. यावेळीही अगोदर सुरुची आणि पियुष यांच्यात प्रेम होतं आणि मग आता लग्न केलंय. पण त्यांचं नातं आणि लग्नाबाबत सुरुची व पियुषने कोणालाही कळू दिलं नाही. याबाबत सुरुचीने एका मुलाखतीत म्हटलंय की “सगळ्या गोष्टी खासगी ठेवणं हा माझा स्वभाव आहे. माझं व्यक्तीमत्त्वच तसं आहे. म्हणून आमच्या नात्याबाबतही मी कुठे समजू दिलं नाही. त्याचबरोबर लग्नही अगदी खासगी पद्धतीने कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये केलं”.

तसेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सुरुचीने तिच्या लग्नाबाबत व तिच्या नवऱ्याबाबत म्हटलंय की “मी खूप खूश आहे. माझा आनंद मी आता शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. हा क्षण माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता. मी एका चांगल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे त्यासाठी खूप आनंदी आहे. तो काळजी घेणारा आणि भावनिक आहे. मी स्वतःला खूप नशिबवान आणि भाग्यवान समजते की पियुषबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला”. असं अभिनेत्री सुरुची अडारकर हिने म्हटले आहे.

पण दुसरीकडे मात्र सोशल मिडीयावर अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे हे दोघेही पियुषच्या या तिसऱ्या लग्नामुळे खूप ट्रोल होत आहे.

Share this Post:

Leave a Comment

Scroll to Top