Nilesh Sable reply Sharad Upadhye: मंडळी सध्या अभिनेते निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांत सोशल मिडियाच्या माध्यमातून वाद सुरु आहे, दोघांनीही एकमेकांवर काही आरोप केले आहे. मग यांतील वादाचे नेमके कारण काय याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया..
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी शो ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या नव्या पर्वात काही मोठे बदल असणार आहेत. काही जुने चेहरे वगळ्यात आले आहेत. यात प्रमुख नाव म्हणजे या शो चे सूत्रसंचालक अभिनेते डॉ. निलेश साबळे यांनाही वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागीआता अभिनेता अभिजीत खांडकेकर हा या शो चा सूत्रसंचालक असेल.
यामुळेच काहीजनांनी ‘चला हवा येऊ द्या’ या शो मधून अभिनेते निलेश साबळे यांना डच्चू दिल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. याचाच उल्लेख करत राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या शो मधील त्यांचा अनुभव शेअर करत अभिनेते निलेश साबळे यांच्यावर निशाना साधला. यात त्यांनी निलेश साबळेवर काही आरोप सुद्धा केले आणि त्यांच्या डोक्यात हवा गेली होती असंही शरद उपाध्ये यांनी म्हटले. शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेंबद्दल अहंकार, गर्विष्ठ, अध:पतन असे शब्दही वापरले आहे.
शरद उपाध्ये यांच्या या आरोपांना आता अभिनेते निलेश साबळे यांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ पोस्ट करत त्यांना उत्तर देत त्यांचे सर्व फेटाळले आहे. तसेच चला हवा येऊ द्या या शो मधून काढले नसून मी स्वतः हा शो सोडला आहे, कारण माझ्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे, असं निलेश साबळे म्हणाले. पण यात त्यांनी सुद्धा राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यावर काही आरोप केले. शरद उपाध्येंनी याआधी मला भंगारवाला म्हणून हिणवलं, 2 वेळा इग्नोर केलं पण आता बोलणं गरजेचं वाटलं असंही निलेश साबळे म्हणाले.
तर अगोदर राशीचक्रकार शरद उपाध्ये हे सोशल मिडिया पोस्ट करत अभिनेते निलेश साबळे यांच्याबद्दल नेमके काय म्हणाले त्याबद्दल माहिती बघूया..
शरद उपाध्ये म्हणाले की “आदरणीय नीलेशजी साबळे, आपल्याला हवा येऊ द्या च्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही, मला तुम्ही एकदा बोलवले होते.त्याप्रमाणे मी ११ वा.पोहोचलो.पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगीतले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुम मध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा.स्माईलही न देता स्टेजवर गेलात.
इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो.
स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा, सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल.अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती. 🙏”
अशी पोस्ट करत राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी अभिनेते निलेश साबळे यांच्यावर अनेक आरोप केले. यालाच उत्तर देण्यासाठी निलेश साबळे यांनीही सोशल मिडीयावर दोन व्हिडीओ पोस्ट केले. यात निलेश साबळे म्हणाले की “मला शोमधून काढून टाकलेलं नाही. मी स्वतःहून माघार घेतली कारण माझ्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. तारखा मिळत नव्हत्या, त्यामुळे मी झी मराठीकडून विनंती करून माघार घेतली आहे.”
शरद उपाध्येंनी 2014 मधील सेटवरील अनुभव सांगत, “माझा अपमान झाला, मला पाणी विचारलं नाही, निलेशने स्माईलही दिली नाही,” असे म्हटले होते. यावर उत्तर देताना निलेश म्हणाला की, “तेव्हा मी रिहर्सल करत होतो. प्रत्येक मेकअप रूममध्ये पाण्याची व्यवस्था असते, आणि कलाकारांचा सन्मान करणं ही माझी संस्कृती आहे. मी तुमच्याही पाया पडलो होतो.” वैजयंती आपटे याही गोष्टीच्या साक्षीदार असल्याचं त्याने सांगितलं आहे.
निलेशने हेही उघड केलं की शरद उपाध्येंनी याआधी दोन वेळा अशाच प्रकारच्या पोस्ट केल्या आहेत, आणि एकात तर ‘भंगारवाल्याच्या हाती लागले’ असा अपमानजनक उल्लेख केला होता. “मी दर वेळी गप्प बसलो, पण आता बोलणं गरजेचं वाटलं,” असं म्हणत निलेशने आपल्या संयमी पण ठाम शैलीत त्यांना उत्तर दिले आहे.
तर असा हा सध्या यांतील वाद आहे. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते खाली कमेंट करून नक्की सांगा.