Kiran Mane in Politics: प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी नुकतंच महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी मुंबईत ‘मातोश्री’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला. (Actor Kiran Mane Joins Uddhav Thackeray’s Shivsena)
किरण मानेंनी दिला आश्चर्याचा धक्का
अभिनेते किरण माने राजकारणात येणार असं अनेक दिवसांपासून म्हटलं जात होतं. कारण ते सोशल मिडियाद्वारे सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. तसेच त्यांच्या पोस्ट वरून भाजप हा त्यांचा आवडता पक्ष नाही हे सुद्धा स्पष्ट दिसत होतं. अनेक वेळा तर त्यांच्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या पोस्ट मुळे खूप वादही झाले होते. त्यामुळेच किरण माने हे भाजप विरोधी पक्षात जाणार हे तर स्पष्टच होतं. पण सर्वांना अंदाज होता की ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात जातील. कारण किरण माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसोबत फार जवळीक होती.
अभिनेते किरण माने आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये असलेली ही जवळीक बघता ते राष्ट्रवादीमधेच जातील असाच अनेकांचा अंदाज होता. पण आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
महिला कलाकारांनी गैरवर्तनाचा केला होता आरोप
वर्षभरापूर्वी अभिनेते किरण माने खूपच चर्चेत आले होते. खरंतर त्यांच्या संबंधी खूप मोठा वाद झाला होता. आणि या वादाला राजकीय वळण सुद्धा मिळाले होते. हा वाद म्हणजे त्यावेळी अभिनेते किरण माने मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिकेत विलास पाटील ही भूमिका सकारात होते. पण अचानक त्यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर (Divya Subhash Pugaonkar) आणि शर्वाणी पिल्लई (Sharvani Pallai) यांनी किरण मानेवर गैरवर्तनाचे आरोप केले होते.
पण किरण मानेंनी हे सर्व आरोप फेटाळले आणि आपण सोशल मिडियावर राजकीय भूमिका घेतो त्यामुळे मला मालिकेतून काढले असा आरोप किरण मानेंनी केला. म्हणजेच ते भाजप विरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढल्याचे किरण माने यांचे म्हणणे होते.
किरण मानेंना मिळाली राष्ट्रवादीची साथ
मुलगी झाली हो या मालिकेतून काढल्यानंतर परेशान झालेले किरण माने न्याय मागण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या दारात गेले. राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत किरण माने यांनी त्यांची बाजू समजावून सांगितली तसेच त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण पुन्हा किरण मानेंना मालिकेत एन्ट्री काही मिळाली नाही.
वादाचा किरण मानेंना फायदा
मुलगी झाली हो मालिकेतून गैरवर्तनाच्या आरोपाखाली किरण मानेंना मालिकेतून काढून टाकल्याने काही दिवस किरण माने खूप परेशान दिसले. पण पुढे त्यांना या वादाचा फायदा सुद्धा झाला. म्हणजेच खूप चर्चेत राहिल्याने त्यांना बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक म्हणून बोलावण्यात आलं. आणि येथे किरण मानेंना पुन्हा प्रेक्षकांचे मन जिंकण्याची खूप चांगली संधी मिळाली. किरण मानेंनी सुद्धा या संधीचे सोने केले आणि प्रेक्षकांची पसंती मिळवली. बिग बॉस नंतर किरण मानेंचे नशीब उजळले आणि त्यांना अनेक चित्रपट तसेच मालिका मिळाल्या.
राष्ट्रवादी न निवडता शिवसेना का?
अभिनेते किरण माने हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खूप जवळ होते. त्यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर सुद्धा ते न्याय मागण्यासाठी शरद पवारांकडेच गेले होते. म्हणजेच त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाने त्यांना साथ दिली होती. मग आता किरण मानेंनी राष्ट्रवादीची निवड न करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची निवड का केली? असा अनेकांना प्रश्न पडलाय. कदाचित राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारला पाठींबा दिल्याने किरण माने हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळले असावे. कारण किरण माने हे भाजप विरोधी म्हणून ओळखले जातात. आणि सध्या भाजपच्या एकदम विरोधात असलेला पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना हाच आहे.
तर आता किरण माने यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे. या राजकीय प्रवासासाठी त्यांना खूप साऱ्या सुभेच्छा.