Ketaki Chitale on Manoj Jarange: मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी जातीय सर्वे करायला आलेल्या महानगरपालिका कर्मचारी महिलेला केतकीने अनेक प्रश्न विचारले. यामुळे मराठा समाजातील अनेक तरुणांनी तिला खूप ट्रोल केले होते. पण आता केतकीने मनोज जरांगे पाटील यांच्यावरच निशाना साधलाय. (Marathi Actress Ketaki Chitale on Manoj Jarange Patil)
जात सर्वेक्षाना बद्दल केतकीची संतप्त पोस्ट
अभिनेत्री केतकी चितळे हिने मराठा आरक्षणा संदर्भात जात सर्वेक्षण करायला आलेल्या महिलेला अनेक प्रश्न विचारले होते. याबद्दल तिने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. यात केतकीला त्या महिला कर्मचाऱ्याने “तुम्ही मराठा आहात का?” असं प्रश्न विचारल्यावर केतकीने “अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे.” असं अभिमानाने म्हटलं होतं. तसेच “या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम नाहीत. आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका भेदभाव करण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं ठोठवून जात विचारत आहे. अब गाओ संविधान, संविधान.” असं म्हणत केतकीने जात सर्वेक्षाणाबद्दल संतप्त पोस्ट केली होती.
केतकी चितळेच्या या व्हिडिओ मुळे मराठा समाजातील अनेक तरुण केतकीवर खूप भडकले होते. पण आता पुन्हा एकदा केतकीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाना साधला आहे.
केतकीचा मनोज जरांगेवर निशाना
अभिनेत्री केतकी चितळेने मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्याचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांच्यावर निशाना साधलाय. मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं होतं की “धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना.” असं त्यांचे वक्तव्य होतं. अभिनेत्री केतकीने मनोज जरांगे पाटलांच्या याच वक्तव्याचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.

केतकीने मनोज जरांगे पाटलांवर निशाना साधत म्हटलंय की “आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा.” अशी केतकीची पोस्ट आहे. या स्क्रीनशॉटमध्ये तिने मुस्लीम हा शब्द हाईलाईट करत मनोज जरांगेंचे खरे रूप दिसले आणि त्यांना सनातनींमध्ये फुट पडायची आहे, असा आरोप तिने मनोज जरांगे यांच्यावर केला आहे.