Bigg Boss 17 Grand Finale: अंकिता लोखंडे top 3 मध्ये पोहोचण्यात अपयशी – चाहत्यांना मोठा धक्का

Bigg Boss 17 Grand Finale

Bigg Boss 17 Grand Finale:भारतातील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनाले मधून एक सर्वात धक्कादायक एलिमिनेशन झाले आहे. सलमान खान होस्ट असलेल्या या शोच्या ग्रँड फिनाले top 5 पैकी एलीमिनेट होणारी चौथी स्पर्धक ठरली आहे अंकिता लोखंडे. ग्रँड फिनाले मधून 4 थ्या क्रमांकावर एलीमिनेट होणारी स्पर्धक अंकीता लोकेंडे असल्याचे जाहीर होताच प्रत्येकाला धक्का बसला.

अंकीता लोखंडे टॉप 3 मध्ये पोहोचण्यात अपयशी

ट्रॉफी जिंकण्यासाठी अंकिता लोखंडे हा नेहमीच सर्वात मजबूत दावेदार मानला जात होती. मुनव्वर फारुकी नंतर, अंकिताचे नाव होते जे विजेत्याच्या नावासाठी घेतले जातले होते. खरं तर, बिग बॉस 17 च्या चाहत्यांना असा विश्वास होता की या सीजनच्या top 3 मध्ये मन्नारा चोप्रा,अंकिता लोखंडे आणि मुनव्वर फारुकी हे तिघे असतील पण तसे झाले नाही आणि अंकिता top 3 मध्ये पोहोचण्यात अयशस्वी ठरली. हा अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का आहे. (Bigg Boss 17 Grand Finale – Ankita Lokhande fails to reach Top 3)

अंकीता लोखंडे ही टॉप 3 मध्ये पोहोचू शकली नाही यावर सलमान खानचाही विश्वास बसत नव्हता. पण प्रेक्षकांच्या वोटिंगच्या आधारावर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बिग बॉस 17 चे top 2

बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनाले मध्ये अंकिता लोखंडे नंतर मन्नारा चोप्राचे एलिमिनेशन खूप धक्कादायक होते. मन्नारा चोप्रा ही सुद्धा विजेतेपदाची प्रमुख दावेदार मानली जात होती पण ती top 2 मधेही पोहोचू शकली नाही आणि तिसऱ्या क्रमांकावर बाहेर पडली. मन्नारा चोप्राबाहेर पडल्यानंतर मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार हे top 2 स्पर्धक बनले आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top