Ram Mandir Ayodhya: 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी (Ram Mandir Pran Pratishta) अयोध्या नगरी सजली आहे. नुकतंच अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात 22 जानेवारीला अभिषेक करण्यात येणाऱ्या ‘रामलला'(RamLala) च्या मूर्तीची पहिली झलक 18 जानेवारीला समोर आली आहे. मात्र, समोर आलेल्या ‘रामलल्ला’च्या चित्रात मूर्तीचा चेहरा आणि हात पिवळ्या रंगाच्या कपड्याने झाकलेले होते आणि शरीर पांढऱ्या रंगाच्या अंगावरील कपड्यांनी झाकलेले होते. याचा फोटोही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला होता. पण आता आता रामललाच्या ‘श्रीमुखाचे’चे संपूर्ण चित्र समोर आले आहे.
रामललाच्या ‘श्रीमुखाचे’ संपूर्ण चित्र
रामललाच्या ‘श्रीमुखाचे’ संपूर्ण चित्र समोर आल्याने अनेकांनी हा फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रात मूर्तीच्या बाहेरील भागावर भगवान विष्णूचे दहा अवतार दिसतात. यासोबतच ओम आणि स्वस्तिकचे चिन्हही दिसत आहे. मूर्तीमध्ये चक्र आणि गदाही पाहायला मिळते. रामललाच्या मूर्तीमध्ये उजव्या बाजूला हनुमानाच्या पायाची मुद्रा आहे. 18 जानेवारी रोजी रामाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली होती. गाभाऱ्यात मंत्रोच्चार व पूजाअर्चा करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
‘रामलला’ची ही मूर्ती 51 इंच उंच आणि 1.5 टन वजनाची आहे. मूर्तीमध्ये प्रभू राम हे पाच वर्षांच्या मुलाच्या रूपात दाखवले आहेत. त्याच दगडापासून बनवलेल्या कमळावर ते उभे आहे. या मूर्तीचा अभिषेक 22 जानेवारीला अभिजीत मुहूर्तावर होणार आहे. प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाला त्यांच्या आसनावर बसवण्यात आलं आहे.
कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ‘रामलला’ची ही मूर्ती तयार केली आहे. म्हैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्प साकारलेली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलं आहे.
22 जानेवारीला हाफ डे किंवा सुट्टी ची घोषणा
प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक पाहुण्यांना आमंत्रणे पाठवली जात आहेत. यामध्ये अनेक राजकारणी, अनेक कलाकार, क्रीडा क्षेत्रातील अनेक व्यक्ती तसेच अनेक सेलेब्रिटी यांना या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रणे पाठवण्यात आली आहे. प्रभू रामांचा हा भव्य सोहळा पाहण्यासाठी अनेकजण अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहेत. पण सरकारने सामान्य लोकांना घरी बसून tv वर हा सोहळा पाहण्याची विनंती केलीय.
22 जानेवारीला रामललाची विधीवत पूजा अर्चांसह अभिषेक झाल्यानंतर अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामुळेच या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारनं केंद्रीय कार्यालय आणि संस्थांना दुपारी अडीच वाजेपर्यंत ‘हाफ डे’ ची घोषणा केली आहे. तर इतर राज्य सरकारांनी पूर्ण दिवस सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील 22 जानेवारीाल महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.