Samsung Galaxy S24: सॅमसंगने आपला वार्षिक कार्यक्रम सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील SAP सेंटर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात सॅमसंगने त्यांचे तीन सर्वोत्तम प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केले आहे. सॅमसंगच्या Galaxy S24 या सिरीजच्या स्मार्टफोनची गेल्या काही महिन्यांपासून खूप चर्चा होती. आणि आता नुकतंच सॅमसंगने Galaxy S24 या सिरीजचे तिन्ही स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra अशी या तीनही फोनची नावे आहे. तर बघूया सॅमसंगच्या Galaxy S24 या सिरीजच्या या तीनही फोन बद्दल माहिती. (Samsung Galaxy S24 Plus and Ultra Specifications in marathi)
Samsung ने त्यांच्या S24 या सिरीजचे तीनही फोन Galaxy AI सह लॉन्च केले आहेत. सॅमसंगचा हा नवीन Galaxy AI अनेक खास Artficial Intelligence वैशिष्ट्यांसह येतो. उदा. Live Translate, Note Assist आणि Circle to Search. पण यात कंपनीने असंही म्हटलंय की सॅमसंग गॅलेक्सी AI फीचर्स 2025 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य राहतील, त्यानंतर तुम्हाला AI हे फीचर्स वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
तसेच या सिरीज मधील तिन्ही स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 7 वर्षांसाठी अँड्रॉइड आणि सिक्युरिटी अपडेट्सही मिळतील अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. पण 7 वर्षांसाठी OS अपडेट देण्याऐवजी Samsung कंपनीने Galaxy S24 आणि S24 Plus या वेरीएंट मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 हे चिपसेट द्यायला हवे होते. कारण एवढे 7 वर्ष कुणीही एकच स्मार्टफोन वापरत नाही. जास्त करून लोक 3 ते जास्तीत जास्त 4 वर्षांसाठी एखादा स्मार्टफोन वापरतात. त्यात जे एक लाख रुपयांपर्यंतचे फोन घेताय ते लोक तर दर 2 वर्षात नवीन फोन घेतांना दिसतात. दर वर्षी स्मार्टफोन कंपन्या नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन मार्केटमध्ये घेऊन येत असतात. त्यामुळे या कंपन्या आपल्या नवीन फोनचा प्रचार जास्त करतात. त्या दृष्टीने ते जुन्या फोनकडे कंपन्या फारसे लक्ष देत नाही. मग एवढे 7 वर्षांसाठी OS अपडेट देण्याची काही गरज नव्हती.
Samsung कंपनीने त्याच्या या फोन मध्ये Call Assit ची सुविधा दिली आहे, ज्यामध्ये 30 भाषांचे रिअल टाइम भाषांतर उपलब्ध असेल. म्हणजेच तुमच्याशी कोणी दुसऱ्या भाषेत बोलत असेल आणि तुम्हाला त्याचे भाषांतर करायचे असेल, तर तुम्ही त्याचे रिअल टाइममध्ये भाषांतर करू शकाल. Samsung ने चॅट विभागातही ही सुविधा दिली आहे. Galaxy S23 सीरीजमध्ये 13 भाषांना सपोर्ट करण्यात आला आहे.
Galaxy S24 सीरीजमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंग दरम्यान ट्रान्सक्रिप्शनची सुविधा मिळेल. रेकॉर्डिंग दरम्यान तुम्ही जे काही बोलत आहे ते आता तुम्ही वाचू शकाल. सॅमसंगने या सीरिजमध्ये Note Assist हे फीचर दिले आहे, म्हणजेच वाचायला अवघड अशा लेखनात काही लिहिले असेल तर या फीचरच्या मदतीने सॅमसंग ते वाचण्या योग्य बनवेल.
Samsung Galaxy S24 सिरीज चे फीचर्स
यातील Samsung Galaxy S24 हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1 OS वर चालेल. ते 7 वर्षांसाठी देखील अपडेट केले जाईल. या सीरीजच्या फोनमध्ये डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आलेला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या फोनमध्ये Exynos 2400 SoC चिपसेट वापरण्यात आला आहे. या फोनच्या मागील बाजूस 50MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 3X ऑप्टिकल झूम सपोर्टसह 10MP टेलिफोटो लेन्स आहे. या फोनच्या पुढील भागात सेल्फीसाठी 12MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच या फोनमध्ये IP68 रेटिंगचे वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट फीचर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असे काही खास फिचर देण्यात आले आहे.
Samsung Galaxy S24+ या फोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.7-इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1 OS वर चालेल. ते 7 वर्षांसाठी देखील अपडेट केले जाईल. या फोनमध्ये Exynos 2400 SoC चिपसेट वापरण्यात आला आहे. या फोनमधेही मागील बाजूस 50MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 3X ऑप्टिकल झूम सपोर्टसह 10MP टेलिफोटो लेन्स आहे. तसेच या फोनच्या पुढील भागात 12MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Galaxy S24+ या फोनमध्ये 4900mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच या फोनमध्ये IP68 रेटिंगचे वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट फीचर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असे काही खास फिचर देण्यात आले आहे.
Samsung Galaxy S24 Ultra हा फोन Galaxy S24 सिरीज मधील टॉप मॉडेल आहे. त्यामुळेच या फोन मध्ये टॉप क्लास फीचर्स देण्यात आले आहे. Samsung कंपनीने Galaxy One 24 Ultra या फोनला 3 वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यापैकी एका व्हेरिएंट मध्ये Titanium बॉडी देण्यात आली आहे. या 3 वेरिएंट मध्ये 12GB रॅमसह 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.
Galaxy S24 Ultra या फोन मध्ये 6.8 इंचाचा QHD Plus डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. Galaxy S24 Ultra मध्ये कंपनीने टॉप नॉच परफॉर्मेंससाठी Qualcomm चा नवीनतम प्रोसेसर Snapdragon 8 Gen 3 दिला आहे. Samsung ने Galaxy S24 Ultra मध्ये मागील बाजूस चार कॅमेरे दिले आहेत. प्राथमिक कॅमेरा OIS वैशिष्ट्यासह 200 मेगापिक्सेलचा आहे. बाकी उर्वरित तीन कॅमेरे 50MP+10MP+12MP सह येतात. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच यात 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह येते. पण Samsung Galaxy S24 Ultra हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला मोठे पैसे खर्च करावे लागतील.
Samsung Galaxy S24 सिरीजच्या फोनची किंमत
सॅमसंगच्या या नवीन Galaxy S24 सिरीज मधील हे तिन्ही फोन 31 जानेवारीपासून जगभरातील काही बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. तसेच लॉन्च झाल्यापासून या सिरीजचे सर्व फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, आत्तापर्यंत कंपनीने या तीनही फोनची फक्त अमेरिकन किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये या फोनची किंमत किती असणार याची माहिती अजून देण्यात आलेली नाही. खाली दिलेली भारतीय किमत अंदाजे दिलेली आहे.
Samsung Galaxy S24 या फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $799 आहे, आणि भारतात सुमारे 65,500 रुपये इतकी असेल. तर 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $849 आहे, आणि भारतात सुमारे 70,600 रुपये अशी असेल.
Samsung Galaxy S24 Plus या फोनच्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $ 999 आहे, आणि भारतात सुमारे 81,000 रुपये इतकी असेल. तर 12GB + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $ 1,119 आहे, आणि भारतात सुमारे 93,100 रुपये अशी असेल.
Samsung Galaxy S24 Ultra या फोनच्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $ 1,299 आहे, आणि भारतात सुमारे ₹1,29,999 रुपये इतकी असेल. आणि 12GB + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $ 1,419 आहे, आणि भारतात सुमारे ₹1,39,999 रुपये अशी असेल. तर 12GB + 1TB स्टोरेज वेरिएंटची किंमत $ 1,659 आहे, आणि भारतात सुमारे ₹1,59,999 रुपये अशी असेल.
Samsung Galaxy S24 specifications:
- 6.2-inch Dynamic AMOLED 2x FHD+ display
- 1Hz-120Hz RR, Peak brightness: 2,600 nits
- 8GB+128GB | 8GB+256GB | 8GB+512GB
- 4,000mAh battery with 25W charging
- 147 x 70.6 x 7.6mm | 168 grams
- Snapdragon 8 Gen 3 (South Korea, the US, China and Australia) / Exynos 2400 (India + other countries)
- LPDDR5x RAM | UFS 4.0 storage
- 15W wireless charging | 4.5W reverse wireless charging
- Front: 12MP
- Rear: 50MP (main, OIS) + 12MP UW + 10MP 3x zoom telephoto
- Dual SIM, eSIM, 5G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, USB-C (USB 3.2)
- Ultrasonic in-display fingerprint scanner, AKG tuned dual speakers
- Android 14 | One UI 6.1
- 7 generation Android OS updates + 7 years of security patches
- IP68 rating, aluminium frame, Gorilla Glass Victus 2 for display
- Colors: Onyx Black, Marble Gray, Cobalt Violet and Amber Yellow
- Starting price: $799
Samsung Galaxy S24 Plus specifications:
- 6.7-inch Dynamic AMOLED 2x Quad HD+ display
- 1Hz-120Hz RR, Peak brightness: 2,600 nits
- 12GB+256GB | 12GB+512GB
- 4,900mAh battery with 45W charging
- 158.5 x 75.9 x 7.7mm | 196 grams
- Snapdragon 8 Gen 3 (South Korea, the US, China and Australia) / Exynos 2400 (India + other countries)
- LPDDR5x RAM | UFS 4.0 storage
- 15W wireless charging | 4.5W reverse wireless charging
- Front: 12MP
- Rear: 50MP (main, OIS) + 12MP UW + 10MP 3x zoom telephoto
- Dual SIM, eSIM, 5G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, USB-C (USB 3.2)
- Ultrasonic in-display fingerprint scanner, AKG tuned dual speakers
- Android 14 | One UI 6.1
- 7 generation Android OS updates + 7 years of security patches
- IP68 rating, aluminium frame, Gorilla Glass Victus 2 for display
- Colors: Onyx Black, Marble Gray, Cobalt Violet and Amber Yellow
- Starting price: $999
Samsung Galaxy S24 Ultra Specifications:
- 6.8″ QHD+ Dynamic AMOLED 2X LTPO flat display, 120Hz refresh rate, 2600nits peak brightness
- Snapdragon 8 Gen 3 (all countries)
- LPDDR5X RAM and UFS 4.0 storage
- Android 14 (7 years of OS updates)
- 200MP OIS+12MP Ultrawide+ 50MP 5x telephoto OIS+ 10MP 3x telephoto periscope zoom lens OIS rear
- 12MP front camera
- 5000mAh battery with 45 watt wired charging
- 15 watt wireless charging and 4.5 watt reverse wireless
- USB 3.2 port
- IP68 rating
- Bluetooth version 5.3
- WiFi 7 (depending on regions), 6E, 5
- Ultra Sonic In-display fingerprint scanner
- Titanium frame
- Gorilla Glass Armor on front
- 8.6mm thickness
- 233 gram weight
- Starting price: $1,299
Check Offers
![Samsung Galaxy S24 मध्ये AI सपोर्ट सह अनेक दमदार फीचर्स, बघा फोनची संपूर्ण माहिती 3 Samsung Galaxy S24](https://marathijan.com/wp-content/uploads/2024/01/Samsung-Galaxy-S24.jpg)
Samsung Galaxy S24
8 GB RAM | 256 GB ROM
15.75 cm (6.2 inch) Full HD+ Display
50MP + 10MP + 12MP | 12MP Front Camera
4000 mAh Battery
Exynos 2400 Processor
![Samsung Galaxy S24 मध्ये AI सपोर्ट सह अनेक दमदार फीचर्स, बघा फोनची संपूर्ण माहिती 4 SAMSUNG Galaxy S24 1](https://marathijan.com/wp-content/uploads/2024/01/SAMSUNG-Galaxy-S24-1.jpg)
SAMSUNG Galaxy S24+
12 GB RAM | 256 GB ROM
17.02 cm (6.7 inch) Quad HD+ Display
50MP + 10MP + 12MP | 12MP Front Camera
4900 mAh Battery
Exynos 2400 Processor
![Samsung Galaxy S24 मध्ये AI सपोर्ट सह अनेक दमदार फीचर्स, बघा फोनची संपूर्ण माहिती 5 samsung galaxy s24 ultra](https://marathijan.com/wp-content/uploads/2024/01/samsung-galaxy-s24-ultra.webp)
SAMSUNG Galaxy S24 Ultra
12 GB RAM | 256 GB ROM
17.27 cm (6.8 inch) Quad HD+ Display
200MP + 50MP + 12MP + 10MP | 12MP Front Camera
5000 mAh Battery
Snapdragon 8 Gen 3 Processor