Bigg Boss 17 Ankita Lokhande: बिग बॉस 17 मध्ये मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्या भांडणात विकिची आई रंजना हिने अंकिताला सुनावल्यामुळे अभिनेत्री राखी सावंत हिने देखील एक व्हिडिओ पोस्ट करत अंकिताच्या सासूला चांगलंच सुनावलं आहे. (Bigg Boss 17 Rakhi Sawant Supports Ankita Lokhande)
बिग बॉसच्या घरात अंकिता-विकीचे भांडण
बिग बॉस 17 मध्ये मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडे ने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली. पण आता बिग बॉसच्या घरात यांचं नातं तुटतंय की काय? असा आता सर्वांनाच प्रश्न पडलाय. बिग बॉसच्या घरात या पती-पत्नी मध्ये अनेकवेळा भांडणं झालीय. आणि याचे पडसाद बिग बॉसच्या घराबाहेर उमटत असल्याचेही स्पष्ट दिसतंय. विक्कीची आई रंजना ही हिने तर तिच्या मुलाची बाजू घेऊन सुनेला म्हणजेच अंकिताला अनेकवेळा सुनावलंय. त्यात अंकिताच्या सासरच्या मंडळींनी अंकिताच्या माहेरी सुद्धा फोन करून अंकिता विकी बरोबर बिग बॉसच्या घरात चुकीचे वागत असल्याचे म्हटले असल्याची माहिती मिळतेय.
भांडणाचा अंकिताला होतोय फायदा
या सर्व गोष्टी घडत असल्याने अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांचे लग्न टिकणे आता फार अवघड दिसू लागलेय. बिग बॉसच्या घरात या पती-पत्नी मध्ये होत असलेले भांडणं बघून आता अनेक प्रेक्षक अंकिता लोखंडेला सपोर्ट करत असल्याचे दिसताय. आता तर अनेक कलाकार अंकिता लोखंडेच्या सपोर्ट मध्ये पोस्ट करताने सुद्धा दिसत आहे. म्हणजे या बिग बॉसच्या घरात अंकिताचे तिचा पती विकी जैन सोबत भांडण होत असले तरी तिला या भांडणाचा बिग बॉस शोच्या दृष्टीने खूप फायदा होत आहे. कारण यामुळेच अंकिता लोखंडेची फक्त बिग बॉस शो मधेच नाही तर शो बाहेर सुद्धा खूप चर्चा होत आहे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात अंकिताला सपोर्ट करताय. म्हणजेच तिच्या वोटिंग मध्येही खूप मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अंकिता लोखाने हा शो जिंकण्याची शक्यता आहे.
नुकतंच मराठी बिग बॉस मध्ये झळकलेली आणि सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत अभिनेत्री राखी सावंत हिने अंकिता लोखंडेला सपोर्ट करत अंकिताच्या सासूला अगदी खडेबोल सुनावले आहे. अभिनेत्री राखीने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात ती अंकिताच्या सासूची शाळा घेत “तुम्ही कैकयी बनू नका” असं सुद्धा म्हणाली आहे.
या व्हिडीओ मध्ये राखीने म्हटलंय की “हॅलो मित्रांनो, मला अंकिताच्या सासूला काही गोष्टी सांगायच्या आहेत. सास भी कभी बहू थी. त्या दोघांच्या भांडणात तुम्ही का पडताय? तुम्ही काय करत आहात? खा, प्या आणि शांत बसा. असं पण अंकिता बिग बॉस जिंकणार आहे. ही राखी सावंतची भविष्यवाणी आहे. तेव्हा तर तुम्हाला खूप आनंद होईल. माझी सून जिंकली, असं म्हणाल. अंकिताच्या सासूबाई असं करू नका, मुलाच्या आणि सुनेच्या भांडणात पडू नका. आमच्या घरीही खूप भांडणं व्हायची, पण माझी आई यात कधीच पडली नाही. सूनेचा मान ठेवा. तिचा मान ठेवलास तर तुझ्या मुलींनाही सासरी मान मिळेल. आम्ही सगळे अंकितावर खूप प्रेम करतो. अंकिता माझ्या बहिणीसारखी आहे. मी तुमच्या घरीही आले होते. तुम्ही मला देवीसारख्या वाटायच्या. तुम्ही कैकयी बनू नका. घर सांभाळा, ते तोडू नका. तिला पण आनंदानं प्रेमाणं ठेवा.”
असं म्हणत अभिनेत्री राखी सावंत हिने अंकिता लोखंडेची सासू रंजना हिची चांगलीच शाळा घेतल्याची दिसतेय.