गव्हाची चपाती का खाऊ नये? याचे फायदे आणि नुकसान | Wheat Chapati – Advantages and Disadvantages

Wheat Chapati Advantages and Disadvantages

Wheat Chapati – Advantages and Disadvantages: भारतीय लोक जो पदार्थ दररोज कमीत कमी दोन वेळेस तरी खातात तो पदार्थ म्हणजे ‘चपाती’ ज्याला पोळी असं देखील म्हणतात. आपल्या देशात काही लोक तर असेही आहे जे सकाळी आणि दुपारी नाश्त्याला चहा बरोबर सुद्धा चपातीच खातात. म्हणजेच गव्हाची चपाती हे भारतीयांचे मुख्य अन्न आहे असंच म्हणावं लागेल. पण आरोग्याच्या दृष्टीने गव्हाची चपाती किंवा पोळी खाणे हे कितपत योग्य? आता तर वजन कमी करण्यासाठीही गव्हाची चपाती न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळेच आरोग्याचा विचार करता चपाती खावी की नाही? याविषयी आज थोडक्यात माहिती बघूया. (Why not eat wheat chapati? Its advantages and disadvantages)

गव्हाची चपाती खाण्याचे फायदे

अनेक आहारतज्ज्ञांच्या मते संतुलित आहारामध्ये गहू हा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने तो योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरत नाही. गहू हा अशा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. यात पोटॅशियम, फोलेट, Vitamin B6, Vitamin B12, फायबर, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि सोडियम यांच्या सोबतच इतरही अनेक पोषक तत्वे गव्हामध्ये असतात. तसेच गव्हात ग्लुटेन असते जे एक प्रकारचे प्रोटीन आहे. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात गव्हाची चपाती खाणे फायदेशीर ठरते.

जर आपण एकदमच गव्हाची चपाती खाणे बंद केले तर महिन्याभरानंतर आपल्या शरीराची उर्जा पातळी कमी होऊ शकते. यामुळे तुम्हाला अशक्तपणा देखील जाणवू शकतो. तसेच इतर आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चपाती खाणे कसे कमी करता येईल किंवा कसे बंद करता येईल या माहितीसाठी हा संपूर्ण लेख नक्की वाचा.

चपाती खाण्याने होणारे नुकसान

चपाती हा प्रत्येक भारतीयाचा दररोजचा आवडता पदार्थ जरी असला तरही तो शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतो. आजकाल अनेक लोक हेल्थ (Health) विषयी जास्त जागरूक झाले आहे. यापैकी अनेकांनी चपाती खाण्याऐवजी त्याला पर्याय शोधले आहे. आता तर अनेक जिम ट्रेनर सुद्धा वजन कमी करण्यासाठी किंवा बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी चपाती न खाण्याचा सल्ला देतात. गव्हाच्या चपाती ऐवजी ते बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. गव्हाची चपाती वगळून ते इतर पदार्थांचा संतुलित आहार सुचवतात.

चपाती खाण्याचे काही फायदे जरी असले तरी लक्षात घ्या की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा खूप घातक असतो. म्हणूनच “अति तिथे माती” अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. म्हणूनच कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणातच असावी. लहानपणापासून आपण चपाती खातोय त्यामुळे ती सवय बदलणं आपल्यासाठी फार अवघड जातं. अचानक चपाती खाणे बंद केले तर इतर हेल्थी पदार्थ कितीही खाल्ले तरीही आपल्याला पोट भरल्यासारखे वाटत नाही. हा आपल्या सवयीचा परिणाम आहे.

तसेच गव्हामध्ये ग्लुटेन असल्याने चपाती आपल्याला खातांना टेस्टी लागते. मग कधी कधी आपण 2-3 पेक्षाही जास्त चपात्या खातो. पण हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. ज्या लोकांना काही गंभीर आजार आहे किंवा ज्यांना ग्लुटेनयुक्त पदार्थ खाण्यास डॉक्टरांनी सक्त मनाई केली आहे अशा लोकांनी गव्हाची चपाती खाणे टाळावे.

काही आहारतज्ज्ञांच्या मते गव्हाची चपाती खाली तर पित्ताचा त्रास, ढेकर येणं, गॅसेस होणं, पोट गच्च वाटणं ई सर्व निघून जाईल. पुणे येथील आहारतज्ज्ञ MBBS डॉक्टर असलेल्या Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande यांनीही नुकतंच सोशल मिडीयावर एक पोस्ट करत गव्हाची चपाती न खाण्याचा सल्ला दिला आहे. यात त्या म्हणाल्या आहे की “मी कधीच सांगत नाही की भाज्या खाऊ नका, भरपूर खा. पालेभाज्या, फळभाज्या, सगळं.! फक्त एक करायचंय की त्यासोबत “पोळी” नाही खायची. इतकंच. वाटल्यास थोडासा नैवेद्य एवढा भात खा. पण ते गहू नको. काहीही करा पण गहू बंद करा. तेव्हाच हा पित्ताचा त्रास, ढेकर येणं, गॅसेस होणं, पोट गच्च वाटणं ई सर्व निघून जाईल.

सवय लावायला थोडे कष्ट आहेत. पण पहिली वेळ ही प्रत्येक गोष्टीची येतेच की. मला माहितेय चपाती सोडताना त्रास होईल, कारण ती टेस्टी असते ना. (अर्थात साखर आहे त्यात) पण हेच करायचंय. आपण लाऊ तशी सवय शरीराला लागते. हे “Gliadorphin” नावाचं जे component आहे ना, ते एक “opiod peptide” आहे. जे gluten (गहू) खाल्ल्यावर बनतं, ते अत्यंत खराब आहे. अगदी अफू सारखं (Opioid peptide) म्हणून तर चपाती आवडते. ती सोडावीशी वाटत नाही. ते ह्याच “अफू सारख्या” असणाऱ्या कंपोनंट मुळे. तेच आपल्याला एडिक्शन लावतं. आणि कधी आपण 2-3 पोळ्या खातो हे आपल्यालाच कळत नाही…!” असं Dr. Mrudul यांनी म्हटलं आहे.

यात त्यांनी गव्हाची चपाती खाणे पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. पण हे करने सर्वांसाठी फार अवघड गोष्ट आहे. त्यासाठी हळूहळू सवय लावावी लागेल.

चपाती खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण

गव्हाची चपाती खाणे लगेचच पूर्णपणे बंद करणे मुश्कील असले तरी आपण ती गोष्ट नियंत्रणात आणू शकतो. म्हणजेच यासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात चपाती खाल्ली तर आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाही. गव्हाची चपाती खाण्याची एक विशिष्ट वेळ पाळावी लागते. ते म्हणजे रात्री चपाती न खाता ती दुपारी खावी.

रात्री चपाती न खाण्यामागचे कारण म्हणजे चपातीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स आढळतात. रात्री ते पचायला जास्त वेळ लागतो. आणि विशेष म्हणजे रात्री चपाती खाल्ल्याने साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही असतो. एका चपातीमध्ये साधारण 71 कॅलरी असते. जर रात्रीच्या वेळी 2 चपात्या खाण्यात गेल्या तर तुमच्या शरीरात 142 कॅलरी जाते. म्हणूनच रात्रीच्या वेळी चपाती खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका जास्त असतो.

या कारणामुळेच गव्हाची चपाती दुपारी खाणे जास्त योग्य आहे. दुपारच्या वेळी आपल्या शरीराची हालचाल अधिक प्रमाणात होत असते त्यामुळे चपाती लवकर पचू शकते. आणि शरीराला आवश्यक असणारी कॅलरी योग्य प्रमाणात मिळते. पण आपण दुपारी जरी चपाती खात असलो तरीही 2 पेक्षा जास्त चपाती खाऊ नये. त्यात डाळ,भात, भाजी, आणि इतर पदार्थ असा संतुलित आहार (balanced diet) नक्कीच ठेवा.

पण यातही अनेकांना अशी समस्या असते की त्यांना रात्रीची चपाती खाण्याची सवय असते. ती सवय लगेचच सुटत नाही. मग त्यांनी काय करावे? तर अशा लोकांनी रात्रीच्या वेळी फक्त एक चपाती खावी. एक चपाती बरोबर संतुलित आहार असावा. पण यांनतर म्हणजेच जेवण झाल्यानंतर थोडं चालणे गरजेचे आहे. यामुळे चपाती पचायला मदत होते. तसेच रात्री खूप उशिरा जेवण करू नये. संध्याकाळी 7 च्या आसपास जेवण करावे म्हणजे चपाती पचायला पुरेसा वेळ मिळतो.

तर अशा प्रकारे गव्हाची चपाती खाण्याचे काही फायदे आणि नुकसान आहे. पण आरोग्याचा आणि फिटनेसचा विचार करता चपाती कमी आणि दिवसा खाणेच जास्त योग्य आहे. तसेच जमलं तर चपाती खाण्याऐवजी इतर पर्याय नक्की शोधा. यासाठी योग्य आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच या बातमी मागचा आमचा उद्देश आहे.

Health Disclaimer: The information given in this article/post regarding health is preliminary. This information is not a substitute for medical advice and should be checked by a doctor or medical specialist before using this information. Marathijan (marathijan.com) neither our website nor its author takes responsibility for this information. Our aim behind this news is to make people aware about health and inspire them for it.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top