Gautami Deshpande Wedding: सध्या अनेक मराठी अभिनेत्रींचे लग्न होत आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे. गौतमीचे नुकतंच स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न झाले आहे. त्यांचा हा विवाहसोहळा पुण्यात अत्यंत थाटात पार पडला. या लग्नास अनेक मराठी कलाकार सुद्धा हजर होते.
नुकतंच अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत ती लग्न करत असल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली. यांनतर आता तिच्या हळदी, संगीत आणि लग्न सोहळ्याचे काही फोटो व्हायरल होत आहे.
बहिणीच्या लग्नात मृण्मयीचा खास उखाणा
अभिनेत्री गौतमी देशपांडे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या छोट्या बहिणीच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमासाठी मृण्मयीने खास तयारी केली होती. तसेच बहिणीच्या हळदी आणि संगीत सोहळ्यात अभिनेत्री मृण्मयीने अगदी धम्माल डान्स सुद्धा केला.
अभिनेत्री गौतमी आणि स्वानंदच्या या लग्नात गौतमीची मोठी बहिण मृण्मयीने कानपिळीत नवरदेवाचा म्हणजेचा स्वानंदचा कान पिळल्याचे बघायला मिळाले. तसेच गौतमी आणि स्वानंदची लग्नगाठ बांधताना मृण्मयीने एक खास उखाणा सुद्धा घेतला. यात मृण्मयीने उखाणा घेत म्हटलं की “गौतमी आणि स्वानंदची आयुष्यभरासाठी बांधलीये घट्ट गाठ, स्वप्नीलने जशी माझी नाही सोडली.. तशीच स्वानंद कधीच सोडू नको तिची साथ”. असा उखाणा अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने घेतला आहे.
गौतमीने दिला आश्चर्याचा धक्का
अभिनेत्री गौतमी देशपांडे ही झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ (Majha Hoshil Na) या गाजलेल्या मालिकेत झळकली होती. या मालिकेद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्री गौतमी हीची माझा होशील ना ही मालिका खूप लोकप्रिय झाल्याने पुन्हा नवीन मालिकेत किंवा आपल्या मोठ्या बहिणी प्रमाणे चित्रपटांत झळकेल असं तिच्या सर्व चाहत्यांना वाटलं होतं. पण एकदम लग्नाची बातमी देवून गौतमीने तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
गौतमीचा पती करतो हे काम
तर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिचे कन्टेंट क्रिएटर आणि सोशल मिडिया इन्फ़्लुएन्सर तसेच अभिनेता असलेल्या स्वानंद तेंडुलकर सोबत अत्यंत थाटात लग्न झाले आहे. सध्या स्वानंद तेंडुलकर हा ‘भाडिपा’(BhaDiPa – Bharatiya Digital Party) या प्रसिद्ध मराठी मनोरंजन युट्युब चैनेलचा व्हाइस प्रेसिडेंट म्हणून काम बघत आहे.
अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचे लग्न झाल्याबद्दल अभिनंदन आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या सुभेच्छा.