Shreyas Talpade Heart Attack: मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade) याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या ‘बेलेव्ह्यू’ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेय. (Shreyas Talpade health update – Shreyas Talpade Heart Attack after Welcome to The Jungle movie shooting)
शुटींग संपल्यानंतर छातीत दुखू लागले
अभिनेता श्रेयस तळपदे हा सध्या ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to The Jungle) या चित्रपटाचे शूटिंग करत होता. गुरुवार 14 डिसेंबर रोजी या चित्रपटाच्या सेटवर तो सगळ्यांशी हसून खेळून बोलला. शुटींग संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने त्याची पत्नी दिप्तीला थोडं अस्वस्थ वाटत असल्याचे आणि छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्याची पत्नी दिप्तीने त्याला ताडडीने हॉस्पिटल मध्ये नेले पण वाटेतच असतांना श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध झाला.

सध्या अँजिओप्लास्टी केल्यानंतर श्रेयसची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. श्रेयसची तब्येत आता व्यवस्थित असून त्याला दोन दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, अशी माहिती श्रेयसच्या टीमकडून देण्यात आली आहे.
वेलकम टू जंगल चित्रपटातील कलाकार
अभिनेता श्रेयस तळपदेने आतपर्यंतच्या 45 पेक्षाही अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. तो आता लवकरच दक्षिण भारतीय चित्रपटात सुद्धा झळकणार आहे. पुष्पा या प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपटाच्या हिंदी वर्जनला डबिंग करतांना अभिनेता श्रेयस तळपदेने त्याचा आवाज दिला होता. याची खूप चर्चाही झाली होती. आता सध्या श्रेयस तळपदे हा वेलकम टू जंगल या हिंदी चित्रपटामध्ये काम करतोय. हा एक विनोदी चित्रपट असेल. यात अभिनेता श्रेयस तळपदे सोबतच अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि अभिनेत्री रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस आणि लारा दत्ता यांच्यासह अनेक प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार झळकणार आहेत.

अभिनेता श्रेयस तळपदे का काही दिवसांपूर्वी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी मराठी वरील मराठी मालिकेत झळकला होता. ही मालिका खूप गाजली. यात श्रेयशच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.
अभिनेता श्रेयस तळपदे हा लवकरच बरा होऊन पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करतांना दिसेल अशी आशा आपण व्यक्त करूया. यासाठी श्रेयसला खूप साऱ्या सुभेच्छा.