Rajeshwari Kharat: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री सिनेमात शालूच्या भूमिकेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने सध्या धर्म बदलल्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे. खरंतर तिच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
अभिनेत्री राजेश्वरी खरातचे फँड्री चित्रपटानंतर इतर चित्रपट यशस्वी ठरले नसले तरी सोशल मिडियावर ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर असते, यामुळे ती चर्चेत असते. पण यावेळी मात्र ती वेगळ्याच फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
राजेश्वरीने नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पाण्यात डुबकी मारताना दिसत आहे. तिच्या डोक्यावर कोणाचातरी हात आहे. राजेश्वरीनं शेअर केलेल्या फोटाला हिनं “Baptised ❤️” असे कॅप्शन दिलं आहे. म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, कारण बाप्तिस्मा (Baptism) हा ख्रिश्चन धर्मातील एक पवित्र धार्मिक विधी मानला जातो. Baptism द्वारे एखादी व्यक्ती ख्रिस्ती समुदायात औपचारिकरित्या सामील होते. अभिनेत्री राजेश्वरी खरातनेही हा विधी पूर्ण करत ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला आहे.

अभिनेत्री राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे फोटो तर शेअर केले पण त्यानंतर तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. यामुळे तिने आता तिचे हे धर्म परिवर्तनाचे सर्व फोटो डिलिट केले आहे. पण या अगोदर तिने तिच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देत म्हटलं होतं की “😂निवडणुका, प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण, आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे…हे आज धर्म/जात शिकवायला आले आहेत, तुमचे स्वागत आहे. कोणी पैश्यांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे. टीप :- माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे, आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती. 😊🙏🏻” असं राजेश्वरीने म्हटलं होतं.