RTE अंतर्गत प्रायव्हेट शाळेत मोफत प्रवेशाला सुरुवात, पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना | School RTE Admission

School RTE Admission

School RTE Admission: तुमच्याही बालकांना जर तुम्हाला महागड्या प्रायव्हेट शाळेत मोफत प्रवेश मिळवून द्यायचा असेल तर यंदाच्या 2025-26 या शैक्षणिक वर्षात आरटीई (RTE) म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार (Right to Education) अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या RTE-शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज 14 जानेवारीपासून सुरु करण्यात आली आहे. सन 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा (School), विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे. त्यासाठी, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी RTE Admission च्या माध्यमातून शाळेत प्रवेश मिळणार आहे.

राज्य सरकारच्या RTE Admission प्रवेश प्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी 14 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली असून 27 जानेवारी 2025 या कालावधीपर्यंत सुविधा अर्ज करण्याची सुविधा ऑनलाईपणे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://student.maharashtra.gov.in/adm_portal या लिंकवर पालकांना ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येईल.

अर्ज भरताना पालकांकरीता सूचना (2025-2026)

1) RTE Admission प्रवेश प्रक्रिया 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही.

4) 1 कि.मी, 1 ते 3 कि.मी. अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 च शाळा निवडाव्यात.

5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

11) RTE २५ % प्रवेश 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/01/2025 पर्यंत राहील.

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

13) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस पासबुक रद्द करण्यात येत आहे .

14) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google map वर पत्ता टाकून ते lattitude, longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

RTE अंतर्गत प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो?

RTE ACT 2009 या कायद्या अंतर्गत प्रवेशासाठी वंचित गट आणि दुर्बल गट असे दोन प्रकारचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. या दोन गटात खालील विध्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

वंचित गट:
1) जात संवर्ग : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC).
2) दिव्यांग बालके : यात दिव्यांगांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
3) HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके
4) कोव्हीड प्रभावित बालके (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले)
5) अनाथ बालके

या बालकांचा वंचित गटात समावेश करण्यात आलेला आहे. पण वंचित गटातील या सर्व विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. म्हणजेच त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही.

दुर्बल गटासाठी मात्र आर्थिक उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे. 15 मार्च 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेमध्ये वरील वंचित समाजगटाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व प्रवर्गांचा समावेश दुर्बल गटात होऊ शकतो असं म्हटलं गेलंय. या द्वारे प्रवेश घेण्याऱ्या गटातील विध्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असावे अशी अट आहे. म्हणूनच या गटाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा सादर करावा लागेल. या गटासाठी सादर करावे लागणारे इतर कागदपात्रांबद्दल माहिती खाली दिलेली आहे.

RTE अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

RTE Admission अंतर्गत फ्री प्रवेशासाठी आपल्या जवळच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची माहिती येथे दिलेली आहे. ही सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करायची आहे. बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE Admission अंतर्गत फ्री प्रवेशासाठी सर्वच बालकांची सादर करणे आवश्यक आहेत.

1) बालकाचे आधार कार्ड
2) रहिवासी दाखला : अर्जामध्ये जो सध्याच्या वास्तव्याचा जो पुरावा सादर करणार आहेत तोच रहिवासाचा पुरावा असेल. यातील रहिवासी पुराव्यावरीलच पत्ता अर्जावर सुद्धा लिहावा.
3) जन्मदाखला : बालकाची जन्म दिनांकाची नोंद असलेला जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्मदाखला सादर करावा.
4) जातीचा दाखला : बालक वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाण पत्र सादर करावे.
5) उत्पन्न दाखला : बालक आर्थिक दुर्बल संवर्गातून असेल तर प्रवेशाकरिता 1 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला सादर करावा. यात तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, salary स्लीप, कंपनीचा किंवा Employer चा दाखला, वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही . वंचित जात संवर्गातील म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब) भटक्या जमाती (क) भटक्या जमाती (ड) इतर मागास (ओ. बी. सी.) विशेष मागास बालके (एस.बी.सी.) या संवर्गातील बालक असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही.

6) दिव्यांगांसाठी दाखला : दिव्यांग असल्यास 40% आणि 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
7) घटस्फोटीत महिला असल्यास : न्यायालयाचा निर्णय आणि इतर वर दिलेली कागदपत्रे.
8) विधवा महिला असल्यास : पतीचे मृत्युपत्र आणि इतर वर दिलेली कागदपत्रे.

RTE Admission अंतर्गत फ्री प्रवेशासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती REQUIRED_DOCUMENTS_2024.pdf या सरकारच्या ऑनलाईन PDF फाईल मध्ये मिळेल.

RTE अंतर्गत कोणत्या शाळेत प्रवेश घेऊ शकतो?

सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सी.बी.एस.ई.(CBSE), आय.सी.एस.ई.(ICSE) व आय.बी.(IB) ई.) सह विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील शाळा आहे. (मदरसा, क्लब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक ई शाळा वगळून). यात तुम्ही राहत असलेल्या परिसरातील RTE Admission अंतर्गत येणाऱ्या शाळांची लिस्ट खाली दिलेल्या सरकारी वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

RTE साठी अर्ज कसा करावा?

RTE ACT अंतर्गत 25% राखीव जागांत मोफत प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या School Education and Sports Department या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा. त्याठिकाणी ऑनलाईन अॅप्लीकेशन (Online Application) नावाच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक अर्ज समोर येईल. यात मागितलेली सर्व माहिती भरून तुम्ही RTE Admission साठी अर्ज करता येऊ शकता. अर्ज भरण्यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर या वेबसाईटच्या होमपेजवर आरटीई प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक व्हिडिओ दिलेला आहे. तसंच येथे मार्गदर्गक पत्रिका (User Manual) मध्ये पालकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाही दिलेल्या आहेत.

ऑनलाईन अर्ज आपण घरी आपल्या कॉम्पुटरवरून किंवा लॅपटॉपवरून भरू शकतात. किंवा बाहेर अनेक सायबर कॅफे मध्येही RTE Admission साठी अर्ज करण्यासाठी सुविधा आणि मदत उपलब्ध करून दिली जाते. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण येत असल्यास प्रशासनाने RTE Admission साठी अर्ज करण्यास मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्रही निश्चित केले आहेत. याठिकाणी जाऊनही आपल्याला अर्ज भरता येऊ शकतो.

RTE साठी अर्जांची निवड कशी होते?

RTE Admission अंतर्गत प्रवेशासाठी आलेल्या सर्व अर्जांपैकी काही अर्जांची निवड ऑनलाईन स्वरुपातच लॉटरीच्या माध्यमातून होते. तुम्ही ज्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करताय त्या शाळेपासून तुम्ही जितके जवळ राहत असाल तितकी तुमच्या अर्जाची निवड होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच त्या विशिष्ट शाळेपासून पहिल्या 1 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा आरक्षित जागांसाठी प्राधान्याने विचार केला जातो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्या शाळेपासून 1 ते 3 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार केला जातो. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात त्या शाळेपासून 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार केला जातो.

यातून हे स्पष्ट आहे की सर्वांत अगोदर त्या विशिष्ट शाळेपासून 1 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या अर्ज स्वीकारला जातो. त्यानंतरही जर त्या शाळेतील आरक्षित जागा शिल्लक असेल तर मग 1 किलोमीटर पेक्षा दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार केला जातो. म्हणूनच तुम्ही जेथे राहताय तेथून जवळच असलेल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी तुम्ही RTE अंतर्गत अर्ज करायला हवा.

टीप:- 1) RTE Admission २५ % online प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी online प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
2) बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर.टी.ई. प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत.

इतर अधिक माहितीसाठी आपल्या मराठीजन या वेबसाईटला फॉलो करा, तसेच आपले App डाउनलोड करा – Download App

Share this Post:

1 thought on “RTE अंतर्गत प्रायव्हेट शाळेत मोफत प्रवेशाला सुरुवात, पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना | School RTE Admission”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top