Bima Sakhi Yojana: लाडकी बहिण योजनेसोबतच आता अजून एका योजनेला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, यात महिलांना दरमहा 7 हजार रुपये तर मिळणारच आहे पण त्यासोबतच 48 हजार रुपयेचा वार्षिक बोनस सुद्धा मिळणार आहे. म्हणूनच महिलांसाठी ही नवीन योजना अत्यंत फायद्याची ठरत आहे. ‘विमा सखी योजना’ असं या योजनेचं नाव आहे. LIC ने देशातील महिलांसाठी ही योजना सुरु केली आहे.
विमा सखी योजनेसाठी एकाच महिन्यात 50 हजार पेक्षाही जास्त महिलांचे अर्ज
गेल्या महिन्यात 9 डिसेंबर 2024 रोजी, LIC ने देशातील महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली होती. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत इथं केला आहे. 1 महिन्याच्या आत LIC च्या विमा सखी या योजनेसाठी 52511 महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांना दरमहा 7000 रुपये मिळणार आहेत. अर्ज केलेल्या महिलांपैकी 27695 विमा सखींना पॉलिसी विकण्यासाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर 14583 विमा सखींनी पॉलिसी विकण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे LIC विमा सखी योजना?
देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा विमा सखी योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत देशातील महिलांना 3 वर्षांसाठी एलआयसी एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान महिलांना स्टायपेंडही दिला जातो. प्रशिक्षणादरम्यान पहिल्या वर्षी महिलांना दरमहा 7 हजार रुपये मानधन दिले जाते. दुसऱ्या वर्षी दरमहा 6000 रुपये स्टायपेंड दिला जातो. तर तिसऱ्या वर्षी दरमहा 5000 रुपये स्टायपेंड दिला जातो. याशिवाय चांगल्या कामगिरीसाठी कमिशनही दिले जाणार आहे म्हणजेच वार्षिक 48 हजार रुपये बोनस दिला जाणार आहे, पण यासाठी महिलांना 24 पोलिसी पूर्ण कराव्या लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना एलआयसी एजंट बनण्याची संधीही दिली जाते.

LIC विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय? (Bima Sakhi Yojana Eligibility)
18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला LIC विमा सखी योजनेसाठी अर्ज करू शकते. यासाठी महिलांनाही किमान 10वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. योजनेसाठी एलआयसीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.
विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती अगोदरपासूनच एलआयसी एजंट नसावी, जर तुमच्या परिवारातील एखादी व्यक्ती अगोदरपासूनच एलआयसी एजंट असेल तर मग तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही.
विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर सर्व पात्रता तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर व्यवस्थित बघाव्या..
अर्ज कुठे करायचा? (Bima Sakhi Yojana Application)
LICच्या विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्यांनी दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता, यासाठी लिंक आहे – https://licindia.in/lic-s-bima-sakhi
आवश्यक कागदपत्रे कोणती? (Bima Sakhi Yojana Documents)
LICच्या विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत:-
- अर्जासोबत नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा.
- वयाच्या दाखल्याची स्व-साक्षांकित प्रत.
- पत्त्याच्या दाखल्याची स्व-साक्षांकित प्रत.
- शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राची स्व-साक्षांकित प्रत.
या योजनेसाठी फॉर्म भरतांना जर दिलेली माहिती अपूर्ण असेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे योग्य माहिती भरा आणि पात्र महिलांनी LICच्या विमा सखी योजनेचा लाभ घ्या.
इतर अधिक माहितीसाठी आपल्या मराठीजन या वेबसाईटला फॉलो करा, तसेच आपले App डाउनलोड करा – Download App