Ketaki Mategaonkar Angry: शांत स्वभावाची अभिनेत्री केतकी माटेगावकर याकारणाने प्रचंड संतापली

Ketaki Mategaonkar Angry

Ketaki Mategaonkar Angry: ‘टाइमपास’ चित्रपटातून प्राजू च्या रुपात अख्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली प्रसिद्ध अभिनेत्री तसेच गायिका ‘केतकी माटेगावकर’ हि आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलीय. ‘तानी, शाळा, काकस्पर्श, टाइमपास, फुंतरू, अंकुश’ यांसारख्या चित्रपटातून केतकी माटेगावकरने आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली तर आहेच पण त्यासोबतच एक उत्कृष्ट गायिका सुद्धा आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शो पासून तिला एक गायिका म्हणून ओळख मिळाली होती. पण आता सध्या केतकी हि काही सोशल मिडिया युजर्सवर चांगलीच संतापलीय. (Marathi Actress Ketaki Mategaonkar angry on trollers)

केतकीचे होतंय बॉडी शेमिंग

अशा या उत्कृष्ट गायिका आणि अभिनेत्री असलेल्या केतकीला सोशल मीडियावर काही लोक नको तो त्रास देताय. ती तब्बेतीने बारीक असल्यामुळे काही सोशल मिडिया युजर्स तिचे बॉडी शेमिंग करत अत्यंत चुकीच्या आणि अभद्र भाषेत तिला ट्रोल केलं जातंय. पण मुळातच शांत स्वभावाची असणारी केतकी आता अखेरकार या ट्रोलर्स वर प्रचंड संतापल्याची दिसतेय.

नुकतंच केतकीने एक मोठी पोस्ट करत तिची बॉडी शेमिंग करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. यासोबतच तिला कशा प्रकारचे मेसेज करत हे काही लोक तिची बॉडी शेमिंग करतात याचे काही स्क्रीनशॉट हि तिने शेअर केले आहे.

केतकी माटेगावकरचे सडेतोड उत्तर

बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत अभिनेत्री केतकी माटेगावकरने म्हटलंय की “प्रिय लोकंहो, ज्यांना माझ्याप्रमाणे कधीकधी बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो, किती बारीक आहेस गं, अजून लहान मुलीचे कपडे घालतेस? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळेस भेटलो तेव्हा छान बारीक होतास, आता पोट सुटलंय का जरा?. नातेवाईक असो, ऑफिस मधले सहकर्मचारी असो, कोणीही असो, आपल्याला नेहमी या अशा वाक्यांना सामोरं जाव लागतं.

मी एवढं म्हणेन, यात मी तुमच्याबरोबर आहे. मी पूर्णपणे यामध्ये सामील आहे. पण तुमच्या शरीर रचनेचा अभिमान बाळगा. तुम्ही खूप सुंदर आणि अद्वितीय आहात. देवाने दिलेल्या या वेगळेपणाला महत्त्व द्या. जर एखादा डॉक्टर, आहारतज्ज्ञ, पालक किंवा तुमचे मित्र ज्यांना तुमची मनापासून काळजी असेल, तर तुम्हाला ते जे काही सांगत असतात, त्यांचं ऐका. अशी व्यक्ती नाही जी तुम्हाला खाली खेचू इच्छिते किंवा तुमच्या स्वतःबदल वाईट विचार करायला लावते.

प्रिय ट्रोलर्स, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत, स्किनी, (हाडांचा सापळा) बारीक आहे, हो आहे, आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारीक तशी मी सुद्धा आहे बारीक, तरीही अजिबात न थकता 17-18 तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं.

थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असेल, पण म्हणून रोगी (Unhealthy) आहे का? तर अजिबात नाही, व्यायाम किंवा जीम हा फक्त वजन कमी करायला करतात, असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीके, पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या शारिरीक भागा (Body Parts)वर खुलेपणाने कमेंट करणं, याला तुम्ही ‘स्वातंत्र्य’ आणि ‘शाब्दिक स्वातंत्र्य’ असं नाव देता.

आम्ही ट्रोलिंगपासून मुक्त झालो असलो तरी, जे आम्हाला पाठिंबा देतात आणि प्रेरित करतात अशा 100 आणि 1000 सुंदर लोकांच्या तुलनेत तुमची संख्या फार कमी आहे. आम्ही कलाकार सुद्धा माणसं आहोत, आम्हालाही कुठे कट लागल्यावर रक्त निघतं, आम्हीही दुखावलो जातो. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल. याचा विचार करा.

आणि काही लोकं असे ही असतील ज्यांना खरंच वैद्यकीय समस्या (Medical problem) असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल. कल्पना करा की, तुम्ही त्यांना कोणत्या भयंकर मानसिक अवस्थेमध्ये टाकत आहात. थोडे दयाळू आणि प्रेमळ व्हा. थोडी सहानुभूती बाळगा.

माझ्या सर्व प्रिय आणि सर्वात मौल्यवान चाहत्यांना: तुमच्या सततच्या प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि निष्ठेसाठी खूप खूप धन्यवाद. मी जशी आहे तशीच मला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला समजून घेता. तुमचे सकारात्मक संदेश, मला प्रेरित करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा असं काही घडतं तेव्हा तुम्ही पहिले असतात जे मला तुमच्या प्रतिक्रियेतून आणि पोस्टमधून हसवतात. मी तुमचे डीएमस आणि मेसेजच्या कमेंट वाचते. तुम्ही दिलेला पाठिंबा पाहून मी खूप भारावून गेले आहे.

मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगलं होत जाण्याचा प्रयत्न करतेय आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन. खूप सारं प्रेम, केतकी.”

असं अभिनेत्री केतकी माटेगावकरने तिच्या या पोस्ट मध्ये म्हटलंय. यात तिला बारीक तब्बेती वरून बॉडी शेमिंग करणाऱ्यांना तिने चांगलंच सुनावलं आहे.

Share this Post:

1 thought on “Ketaki Mategaonkar Angry: शांत स्वभावाची अभिनेत्री केतकी माटेगावकर याकारणाने प्रचंड संतापली”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top