छगन भुजबळांचा अजित पवारांवर हल्लाबोल सुरुच, पक्ष बदलणार? अजित पवारांची प्रतिक्रिया | Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal: महाराष्ट्रातील जेष्ठ ओबीसी नेते अशी ओळख असलेले राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळातून डावल्यानंतर ते आता दररोज उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. छगन भुजबळ यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे छगन भुजबळांवर भाष्य केलं आहे.

काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय. मंत्री जास्त आहेत. पूर्वी 28 मंत्री आणि बाकी राज्य असायचे पण आता तसे नाही. त्यामुळे काहींना एकच खाते आले आहे, असंही अजित पवारांनी सांगितले. आपण विचारावर ठाम आहोत. आपण भाजप सोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू, असं अजित पवार बारामतीमध्ये म्हणाले.

छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार?

दरम्यान यानंतर भुजबळांनी देखील अजित पवारांना अप्रत्यक्षरित्या लक्ष केलं. सुरूवातीला राज्यसभेवर पाठवलं नाही, आता आमदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जायला सांगितल्याचं छगन भुजबळांनी म्हणाले. दरम्यान छगन भुजबळांनी अजित पवारांवर वयावरुन टीकास्त्र डागलं. तर शरद पवारांचं देखील कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. तसेच आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय?, भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार का? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

छगन भुजबळांची नाराजी आणि संताप

मुंबईमध्ये रविवारी (22 डिसेंबर) ओबीसी बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी केला. या बैठकीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर देखील छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथं थांबावं लागलं, राज्यसभेत थांबावं लागलं, तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा…म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसं शक्य आहे?, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का?, या प्रश्नावर मला माहित नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असं छगन भुजबळ म्हणाले आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top