राष्ट्रवादीचे नेते ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत गेल्याचा दावा – छगन भुजबळ यांच्यावरील वादग्रस्त पुस्तक | Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी आपण भाजपसोबत गेल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातून करण्यात आलेला आहे. पुस्तकात केलेल्या दाव्या मुळे खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा समोर आल्यानं आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. पण दुसरीकडे मात्र छगन भुजबळ यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तर बघूया याबद्दल थोडक्यात माहिती.

राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकामध्ये खळबळजनक दावे करण्यात आलेले आहेत. “ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती. त्यामुळेच नवाब मलिक, अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं. या शिवाय सुनेत्रा पवारांचं नावही यामध्ये आलेलं होतं… या बाबत शरद पवारांना सगळी माहिती होती . परंतु ते भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते.. शरद पवारांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या…”, तसेच सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता, असंही भुजबळ म्हणाल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकाची लिंक येथे खाली दिलेली आहे.
Rajdeep Sardesai Book – https://amzn.to/3NZ9j1s

“दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता…. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही… अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला… माझ्यासाठी ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जमन्मच होता…” असं छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. लोकसत्ता या वृत्तपत्रात ही बातमी छापून आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सांगितलं की, “आपण वस्तुस्थिती समोर ठेवली आहे, त्याबद्दल अधिक छगन भुजबळ सांगितील”.

पण छगन भुजबळ यांनी मात्र हे दावे फेटाळून लावले आहे. भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही किंवा मी कुठलेही पुस्तक लिहिलेले नाही. तसेच ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप हा केवळ आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मला तुरुंगात जाण्याची कुठलीही भीती नाही. बातमीत जे काही प्रसिद्ध झाले तसे मी काहीही बोललेलो नाही. आम्ही विकासासाठीच सत्तेत सहभागी झालेलो आहोत. महाराष्ट्र सदन प्रकरणात न्यायालयाने मला क्लीन चीट दिलेली आहे. ते सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मंत्रिमंडळात होतो. त्यावेळीच न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्यामुळे शंका घेण्याची किंवा संभ्रम होण्याची काहीही गरज नाही,”

“पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक मी पाहिलेले किंवा वाचलेले नाही. तसेच, या पुस्तकात काय प्रसिद्ध झालेले आहे ते सुद्धा मी पाहिलेले नाही. मात्र, हे पुस्तक मी घेणार आहे. तसेच, माझ्या वकीलांनाही देणार आहे. त्यानंतर वकीलांशी चर्चा करुन मी पुढील योग्य ती कार्यवाही करणार आहे,” असं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top