मोमोज आरोग्यासाठी हानिकारक – मोमोज खाल्याने का होत आहे मृत्यू | Momos Side Effects

Momos Side Effects

Momos Side Effects: आजकाल गल्ली-बोळ, चौकात सिल्वर स्ट्रीमरमध्ये उकडलेले मोमोज आणि तिखट लाल मिरचीच्या चटणीसह खाणारे लोक सर्वत्र दिसतात. मोमोज हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, जे खायला स्वादिष्ट वाटते. त्यामुळे हल्ली सगळीकडे मोमोजच्या स्टॉलवर मोमोजप्रेमींची तुफान गर्दी दिसून येते. पण, तुम्हाला माहित आहे का की हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते? आता तर मोमोज खाल्ल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या मिळत आहे. चला तर मग, शास्त्रीय पद्धतीने समजून घेऊ की मोमोज आपल्या आरोग्यासाठी का हानिकारक ठरू शकते.

मोमोज खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

नुकतंच हैदराबाद मध्ये मोमोज खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात फूड स्टॉल लावण्यात आला होता. इथं 31 वर्षीय रेशमा फिरण्यासाठी आली होती. तिला भूक लागली होती, काहीतरी हलकंफुलकं खावं म्हणून तिने मोमोज खाल्ले. हे मोमोज खाल्ल्यानंतर तिला अचानक त्रास होऊ लगला. त्यानंतर ती धाडकन जमिनीवर आदळली आणि यातच तिचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे मोमोज खाल्ल्याने अन्य 50 जणांची प्रकृती बिघडली.

मैद्याचे दुष्परिणाम: मोमोज पचवणे कठीण का असते?

मोमोजचे बाहेरील आवरण तयार करण्यासाठी मैदा वापरला जातो. मैदा हा गव्हाचा असा प्रकार आहे की, ज्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे यातील पोषक घटक आणि फायबर नष्ट होते. यात फक्त स्टार्च राहते, ज्यामुळे मैद्याची प्रकृती आम्लधर्मी होते. शरीरात गेले की हे आपल्यातील हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतं, ज्यामुळे हाडं कमजोर होऊ शकतात. नेहमी मैद्याचा वापर केल्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार वाढतात.

मैदा नीट पचत नाही, आणि अनेकदा आतड्यांमध्ये चिकटतो. यामुळे आतड्यांमध्ये ब्लॉकेज होऊ शकते, ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर पाचनासंबंधी आजार होऊ शकतात.

केमिकलयुक्त पांढरे मोमोज: आरोग्यासाठी घातक

बाजारात मिळणारे मोमोज पूर्णपणे पांढरे आणि मऊ का असतात तर घरचे मोमोज पिवळसर दिसतात? कारण बाजारातील मोमोज पांढरे आणि मऊ बनवण्यासाठी त्यात ब्लीच, क्लोरीन गॅस, बेंझॉयल पेरॉक्साइड, आणि एजोकार्बामाईड यांसारखे हानिकारक केमिकल्स टाकले जातात. हे केमिकल्स आपल्या किडनी आणि पॅनक्रियासवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे डायबेटीस आणि इतर आजार होऊ शकतात.

तिखट लाल मिरचीची चटणी: पचन तंत्रास हानीकारक

मोमोजसह दिली जाणारी तिखट लाल मिरचीची चटणी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. ही चटणी खूप उत्तेजक असते आणि कमी दर्जाची असू शकते. याचा अधिक सेवन केल्यास पाइल्स, गॅस्ट्रेटिस, आणि पोट तसेच आतड्यांमध्ये ब्लीडिंग होण्याचा धोका असतो.

मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) चा धोका: वजन वाढणे ते न्यूरोलॉजिकल समस्या

काही मोमोज विक्रेते त्यांच्या मोमोजमध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) चा वापर करतात, ज्यामुळे त्याचा स्वाद आणि सुगंध वाढतो. मात्र, एमएसजीचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो. यामुळे वजन वाढू शकतं, मेंदू आणि तंत्रिका तंत्रावर परिणाम होऊ शकतो, तसेच हृदयाचे ठोके आणि बीपी वाढण्याची शक्यता असते. याला ‘चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम’ देखील म्हणतात, कारण एमएसजीचा वापर चायनीज फूडमध्ये जास्त केला जातो.

मोनोसोडियम ग्लुटामेट हे ग्लुटामिक ॲसिडपासून बनवले जाते. यात सोडियम असते; जे उच्च रक्तदाब आणि किडनीचा आजार असलेल्या लोकांसाठी हानिकारक आहे. तसेच यामुळे पचनशक्ती मंदावते आणि लठ्ठपणा वाढू शकतो. रक्तदाब आणि किडनीचा आजार आजार असलेल्या लोकांनी मोमोज खाणे टाळावे.

खराब दर्जाचे मांस आणि भाज्या: संसर्गाचे मोठे कारण

मोमोज हे वाफवलेले असतात आणि त्यात भाज्या किंवा मांस-मटणाचा वापर केला जातो तरीसुद्धा त्यात पौष्टिक घटक कमी असतात. यात मैदा किंवा रिफाइंड पिठाचा अतिवापर केला जातो.  काही ठिकाणी नॉनवेज मोमोजमध्ये मृत प्राण्यांचे मांस वापरले जाते, तर व्हेज मोमोजमध्ये खराब झालेल्या किंवा सडलेल्या भाज्या टाकल्या जातात. यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, जसे की संसर्ग, कृमी आणि इतर जीवाणूजन्य आजार होऊ शकतात. खराब दर्जाच्या सामग्रीपासून बनवलेले मोमोज आपल्या आरोग्यावर दीर्घकालीन हानिकारक प्रभाव टाकू शकतात.

अनेकदा वाफवलेले पदार्थ चांगले शिजलेले नसतात. मोमोज करताना मांस किंवा भाज्या चांगल्या न शिजल्यामुळे उलट्या किंवा जठरासंबंधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

सामग्रीची गुणवत्ता

अनेक जण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या स्टॉलवरील मोमोज खातात. हे मोमोज अतिशय स्वस्त दरात विकले जातात. कारण या मोमोजमध्ये वापरली जाणारी सामग्री निकृष्ट दर्जाची असते. अनेकदा लोकप्रिय स्टॉलवरून खाताना किंवा पैसे वाचवताना ग्राहक सामग्रीच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाहीत. अनेक मोमोजविक्रेते भरपूर नफा मिळविण्यासाठी कमी दर्जाची सामग्री वापरतात, पण त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो.

सरकारने मेयोनीजवर बंदी घातली

सँडवीच, मोमोज, शावरमा, अल फहम चिकन आणि फ्रँकी असे बरेच पदार्थ आहेत ज्यात मेयोनीजचा वापर होतो. पण या कच्च्या अंड्यापासून बनवलेले मेयोनेझ खाल्ल्याने आरोग्य विषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मेयोनेझच्या सेवनामुळे अन्न विषबाधा होत आहे. काही दिवसांपूर्वी शवरमा आऊटलेट्सवर अन्नातून विषबाधा झाल्याची प्रकरणे समोर आली होती, त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी शहरातील शवरमा आणि मंडीच्या दुकानांवर छापे टाकले होते. त्यानंतर आता हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात 31 वर्षीय रेशमाचा तेथील फूड स्टॉलवर मोमोज खाल्ल्यानेच मृत्यू झाला होता. तसेच हे मोमोज खाल्ल्याने अन्य 50 जणांची प्रकृती बिघडली होती त्यामुळेच तेलंगणा सरकारने मेयोनीजवर बंदी घातली आहे.

तेलंगणा अन्न सुरक्षा आयुक्तांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “गेल्या काही महिन्यांतील निरीक्षणे आणि तक्रारींवरून असे दिसून आले आहे की कच्च्या अंड्यांपासून बनवलेल्या मेयोनेझच्या सेवनामुळे अन्न विषबाधा होत आहे. ही बंदी बुधवारपासून लागू झाली आहे. जेथे खाद्यपदार्थ लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे दिसून आले, कच्च्या अंडी वापरून बनवलेल्या मेयोनेझचे उत्पादन, साठवण आणि विक्रीवर 30 ऑक्टोबरपासून बंदी घालण्यात येईल. 2024 पासून एक वर्षासाठी बंदी असेल.”

मोमोजमुळे गुदमरून मृत्यू होऊ शकतो

मोमोज खाल्ल्यानंतर दिल्लीतील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. त्याच्या श्वसनमार्गामध्ये मोमो अडकलं होतं. मोमोजमुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
त्यानंतर मोमोज खाणाऱ्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने एक महत्वाचा सल्ला दिली आहे.त्यांनी म्हटलंय की मोमोज गुळगुळीत असतात. त्यामुळे जर कुणी मोमोज नीट चावले आणि गिळले नाहीत तर गुदमरून मृत्यूचा धोका संभवतो. त्यामुळे मोमोज खाताना विशेष काळजी घ्या, असं एम्सच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

मोमोजपासून दूर राहणे का आवश्यक आहे?

मोमोज हे स्ट्रीटफूड आहे. त्यामुळे हे बनवताना स्वच्छतेची तितकीशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळेही अनेकांना त्रास जाणवतो. मोमोज मैद्यापासून तयार केलं जातं. त्यामुळे स्वादुपिंडाशी संबंधित आजार उद्भवतात. त्याचा इन्सुलिन निर्मिती क्षमतेवर परिणाम होतो. शिवाय मज्जातंतूचे विकार, घाम येणं, वारंवार छातीत दुखणं, मळमळ होणं आणि हृदयाचे ठोके वाढणं यासारखे आरोग्य धोक्यात संभवतात.

सर्वांनाच मोमोज खायला आवडतात. स्वस्तात मस्त आणि टेस्टी असल्याने मोमोज खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. स्वादाच्या मागे धावताना आपण बर्‍याचदा आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. मोमोज आठवड्यातून एक प्लेट खाण्यास काहीही हरकत नाही. जोपर्यंत तुम्ही संतुलित आहार घेता आणि त्याविषयी नेहमी जागरूक असता तोपर्यंत तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाही. आरोग्यावर परिणाम होऊ न देता, मोमोजचा आनंद घेण्यासाठी मोमोज करण्याची पद्धत, त्यात वापरण्यात आलेल्या सामग्रीची माहिती घेणे गरजेचे आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top