MNS 2nd List: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहिर करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (raj thackeray) दि. २१ ऑक्टोबर रोजी कल्याण ग्रामीण आणि ठाणे विधानसभेसाठी अनुक्रमे राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.
अशातच दि. २२ ऑक्टोबर रोजी मनसेने ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली. (MNS)
मनसेच्या दुसऱ्या यादीत अमित ठाकरेंना महिमा विधानसभा आणि संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. तसेच इतर ४३ उमेदवारांनी ही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. (MNS)
मनेसच्या दुसऱ्या यादीतील नावे:
१) राजू पाटील- कल्याण पाटील
२) अमित ठाकरे -माहीम
३) शिरीष सावंत-भांडुप
४) संदीप देशपांडे-वरळी
५) अविनाश जाधव-ठाणे शहर
६) संगिता चेंदवणकर -मुरबाड
७) किशोर शिंदे- कोथरुड
८) साईनाथ बाबर-हडपसर
९) मयुरेश वांजळे- खडकवासला
१०) प्रदीप कदम-मागाठाणे
११) कुणाल माईणकर-बोरीवली
१२) राजेश येरुणकर-दहिसर
१३) भास्कर परब-दिंडोशी
१४) संदेश देसाई-वर्सोवा
१५) महेश फरकासे-कांदिवली पूर्व
१६) वीरेंद्र जाधव -गोरेगांव
१७) दिनेश साळवी-चारकोप
१८) भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व
१९) विश्वजीत ढोलम-विक्रोळी
२०) गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
२१) संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व
२२) माऊली थोरवे-चेंबूर
२३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर
२४) निलेश बाणखेले-ऐरोली
२५) गजानन काळे-बेलापूर
२६) सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा
२७) विनोद मोरे- नालासोपारा
२८) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
२९) संदीप राणे – मिरा भाईंदर
३०) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
३१) महेंद्र भानुशाली-चांदिवली
३२) प्रमोद गांधी-गुहागर
३३) रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड
३४) कैलास दरेकर-आष्टी
३५) मयुरी म्हस्के-गेवराई
३६) शिवकुमार नगराळे-औसा
३७) अनुज पाटील-जळगाव
३८) प्रवीण सूर- वरोरा
३९) रोहन निर्मळ- कागल
४०) वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ
४१) महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण
४२) संजय शेळके-श्रीगोंदा
४३) विजयराम किनकर-हिंगणा
४४) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
४५) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी खालीलप्रमाणे…. pic.twitter.com/te6UvdlJoo
— Raj Thackeray (@RajThackeray) October 22, 2024
मनसेने दुसऱ्या यादीत एकूण ४५ जणांना तिकिट दिलं आहे. मनसे महाराष्ट्रातल्या २८८ पैकी जवळपास २०० ते २२५ जागा लढवणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर आता या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे माहीम या विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. मनसेने आणखी एक प्रयोग केला आहे तो म्हणजे वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या निवडणुकीला म्हणजेच २०१९ ला मनसेने आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उभे असल्याने वरळीत उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडेंचं आव्हान असणार आहे. तसंच या ठिकाणी भाजपा किंवा शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) उमेदवार असणार आहे. त्यामुळे वरळीतली लढत तिरंगी होईल हे नक्की.
भाजपाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातही मनसेचा उमेदवार. कोथरुड या ठिकाणाहून मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. येत्या काळात राज ठाकरे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरेंनी आज यादी येणार हे जाहीर केलं होतं त्यानुसार मनसेची दुसरी यादी जाहीर झाली आहे.