Navra Maza Navsacha 2: खूप वाईट चित्रपट – मराठी अभिनेत्याची चित्रपटावर टीका

navra maza navsacha 2

Navra Maza Navsacha 2: २००४ मध्ये प्रदर्शित झालेला एव्हरग्रीन चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा’ याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला ७.८ कोटींची धक्कादायक कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे यांसारखी दमदार स्टारकास्ट आहे.

संमिश्र प्रतिक्रिया: बॉक्स ऑफिस यशासोबत प्रेक्षकांची मतभिन्नता

जरी ‘नवरा माझा नवसाचा २’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवलं असलं तरीही, प्रेक्षकांकडून या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही प्रेक्षक सोशल मीडियावर आपल्या नाराजीची व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांच्या मते, चित्रपटाची स्टोरीलाइन आशेप्रमाणे नव्हती.

अभिनेता ध्रुव दातारचं मत

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता ध्रुव दातारने इन्स्टाग्रामद्वारे आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. त्याने सुरुवातीला स्टोरी टाकून चित्रपटाबद्दल “खरंच खूप वाईट चित्रपट आहे” असं मत व्यक्त केलं. त्यावर बऱ्याच चाहत्यांनी त्याला मराठी कलाकार असल्यामुळे अशा टीका टाळण्याचा सल्ला दिला.

navra maza navsacha 2 marathi actor dhruva datar
Actor Druva Datar About Navra Maza Navsacha 2 Movie

“मी का बोलू नये?”: ध्रुवचा स्पष्ट प्रतिवाद

ध्रुव दातारने आपल्या व्हिडिओद्वारे चाहत्यांना उत्तर देताना सांगितलं की, त्याने फक्त स्वतःचं प्रामाणिक मत मांडलं आहे. “मी मराठी कलाकार आहे म्हणून मी उगाच कौतुक करू का? सॉरी, पण मी असं करू शकत नाही. चित्रपटाचा स्टोरीलाइन मला अजिबात आवडली नाही,” असं त्याने ठामपणे सांगितलं.

कलाकारांची प्रशंसा, पण कथानकावर नाराजी

ध्रुवने सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या अभिनयाचं कौतुक केलं, पण त्याने सांगितलं की, चित्रपटाच्या कथानकाने त्याला निराशा दिली. “सचिन सर आणि सुप्रिया मॅमचा प्रश्नच नाहीये, ते छानच आहेत,” असं त्याने नमूद केलं.

‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी यशस्वी ठरला असला, तरीही त्यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top