Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना आनंदाची बातमी – 3 महिन्यांचे पैसे ॲडव्हान्स मध्ये मिळणार..

ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना सरकार एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आता लाडक्या बहि‍णींना त्यांचे पुढच्या तीन महिन्यांचे पैसे ॲडव्हान्स मध्ये देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. बघूया याबद्दल सविस्तर माहिती..

काय आहे लाडकी बहीण योजना?

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेत, राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. यामुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरावा. तसेच या योजनेच्या पात्रता, कागदपत्रे आणि इतर निकष जाणून घेण्यासाठी आमचे हे आर्टिकल वाचावे – Ladki Bahin Yojana: महिलांना महिन्याला मिळणार 1500 रुपये – लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा? कागदपत्रे काय? बघा संपूर्ण माहिती – Marathijan

हफ्त्यांचे वितरण

या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता रक्षाबंधनाच्या अगोदरच जमा झाला होता. आता तिसरा हफ्ता सप्टेंबर महिन्यात जमा होणार आहे. तसेच ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यात अप्रूव्ह झालेय पण त्यांना अजून एक रुपयाही मिळाला नाही त्या महिलांना त्यांचे राहिलेले 3 ही हफ्ते एकत्रितपणे म्हणजेच ४,५०० रुपये मिळणार आहे. तसेच ज्या महिला येथून पुढे म्हणजेच सप्टेंबर महिन्यापासून फॉर्म भरतील त्यांना दर महिन्याला १,५०० रुपये मिळतील.

3 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना सरकार आता 3 महिन्यांचे पैसे ॲडव्हान्स मध्ये देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. मिळत असलेल्या माहितीनुसार सणांचे गिफ्ट म्हणून बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहे. ॲाक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे ४ हजार ५०० रुपये १९ ॲाक्टोंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार असून, हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top