या कारणामुळे महेश मांजरेकर बिग बॉस मधून पडले बाहेर..| Why Manjrekar Exit From Bigg Boss Marathi 5

Why Manjrekar Exit From Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी या शोच्या पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. बिग बॉस मराठीच्या या नव्या सीझनची नुकतीच घोषणा झाली. इतकंच नव्हे; तर या सीझनचा होस्ट सुद्धा बदलला आहे. (Reason why Mahesh Manjrekar Exit From Bigg Boss Marathi 5?)

आता महेश मांजरेकर नाही तर लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख या पाचव्या सीजनचं सूत्रसंचालन करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अभिनेता रितेश हा मराठी मनोरंजनविश्वाशी चांगल्याप्रकारे जोडला गेला आहे. त्यामुळं आता तो या कार्यक्रमातूनही मराठी कलाकार आणि प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसणार आहे. पण महेश मांजरेकरांची दर शनिवारी आणि रविवारी होणारी चावडी खूप गाजत होती, कारण ते या विकेंडच्या चावडीवर सर्व स्पर्धकांची शाळा घेत असत. आणि प्रेक्षकांनाही ते प्रचंड आवडायचे. पण आता रितेश देशमुखला तशाच प्रकारे विकेंडच्या चावडीवर स्पर्धकांची शाळा घ्यायला जमणार का? हे पाहणेही महत्वाचे ठरेल.

दिग्दर्शक तसेच अभिनेते महेश मांजरेकर हे आता बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करणार नसल्याने प्रेक्षकांनाही अनेक प्रश्न पडलेय ते म्हणजे मांजरेकरांनी हा शो का सोडला?, याचं काय कारण असावं? असे अनेक प्रश्न प्रेक्षक सोशल मीडियावर विचारत होते, अखेर त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. आणि उत्तर स्वतः महेश मांजरेकरांनीच दिले आहे. ते म्हणजे येत्या काही महिन्यात ते वेगवेगळ्या चित्रपटांच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळं बिग बॉससाठी वेळ देणं त्यांना शक्य होणार नव्हतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मांजरेकरांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगितलं.

या मुलाखतीत मांजरेकर म्हणाले की “मी सध्या मणिरत्नम यांचा ‘ठग लाइफ’ हा चित्रपट करतोय. सोबतच एका कन्नड प्रोजेक्टवरही काम करतोय. दिल्ली, लंडन, बँकॉक या ठिकाणी यांचं शूटिंग होत आहे. त्यामुळे येणारे काही महिने त्यासाठीच बाहेर असणार आहे.” अशी माहिती मांजरेकरांनी दिली आहे.

एकंदरीतच ते त्यांच्या या व्यस्त शेड्युल्डमुळे बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करणार नसल्याचे स्पष्ट होतंय. त्यामुळेच आता बिग बॉस मराठी 5 चे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख हा करणार आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top