Star Pravah: स्टार प्रवाह च्या या मालिका घेत आहे प्रेक्षकांचा निरोप – अभिनेत्रीने मानले आभार

star pravah serial last episode

Star Pavah: गेल्या काही वर्षांपासून स्टार प्रवाह वरील मालिका TRP नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरल्या आहे. पण तरीही ज्या मालिकांचा TRP कमी आहे त्या मालिका बंद करून आता स्टार प्रवाह नवीन मालिका सुरु करत आहे. यापैकीच बंद होणारी एक मालिका म्हणजे कुन्या राजाची गं तू रानी (kunya rajachi ga tu rani). नुकतंच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.

कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेला प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने लवकरच ही मालिका बंद करण्यात आली. मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी यात गुंजा आणि कबिर यांचे पुन्हा लग्न झाल्याचे दाखवण्यात आले. म्हणजेच मालिकेची कहाणी आटोपती घेण्यात आली आहे. नुकतंच या मालिकेत गुंजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्वरी जोग (Sharvari Jog) हिने सर्वांचे आभार मानत एक पोस्ट केली आहे. यात तिने म्हटलेय की “गुंजा.. आज “कुण्या राजाची गं तू राणी” मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होतोय. या मालिकेने मला खूप काही दिलं. खूप चांगली माणसं,खूप अनुभव. गुंजाकडून तर शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या… गुंजाने मला अभिनेत्री म्हणून किती समृद्ध केलं हे माहिती नाही ,पण माणूस म्हणून तिने मला नक्कीच खूप गोष्टी शिकवल्या.आज प्रवास जरी थांबत असला तरी गुंजा आणि तिचं सगळं कुटुंब कायम माझ्या आठवणीत राहील. गुंजावर ,या मालिकेवर, तिच्या कुटुंबावर तुम्ही जसं भरभरून प्रेम केलं तसंच प्रेम यापुढेही कराल हे नक्की.” असं म्हणत अभिनेत्री शर्वरीने तिला या मालिकेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाहचे आणि मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहे.

कुन्या राजाची गं तू रानी या मालीकेसोबातच स्टार प्रवाह (star pravah) वरील अजून एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. बंद होणारी ही दुसरी मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’ (tujhech mi geet gat aahe) ही असल्याची माहिती मिळतेय. आता या मालिकेची कहाणी शेवटाकडे आली आहे. यात मंजुळा ही मंजुळा नसून ती वैदेहीच असल्याचा खुलासा होणार आहे. शेवटी स्वराला तिचे खरे आई-वडील मिळणार असा या मालिकेचा गोड शेवट करत ही मालिका संपणार आहे.

या दोन मालिका बंद करून आता स्टार प्रवाह ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ या दोन नव्या मालिका सुरु करत आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top