Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil movie: मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा उपोषण आंदोलन करत सरकारवर दबाव वाढवला. त्यांच्या याच संघर्षाची गाथा चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ असं या चित्रपटाचे नाव आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलनामुळे फेमस झालेले जालना जिल्ह्यातील अंतरवाली, सराटी येथेच या चित्रपटाचे शूटिंग पार पडले आहे. नुकतंच या चित्रपटाचा टिझर रिलीज झालाय. (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie Teaser)
‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे. तर मनोज जरांगे यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री सुरभी हांडे झळकणार आहे. जय मल्हार या मालिकेमुळे अभिनेत्री सुरभीला खूप प्रसिद्धी मिळाली होती. तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, सागर कारंडे, मोहन जोशी, माधवी जुवेकर, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौघुले हे कलाकार सुद्धा झळकणार आहे.
सोनाई फिल्म क्रिएशन्स प्रस्तुत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केले आहे. तसेच शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटाच्या टीझर मध्ये मनोज जरांगे यांचा एक डायलॉग खूपच फेमस होत आहे. “मी बायकोला सांगितलंय की हे बघ, आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा , कुंकू पुसून तयार रहा.” असा यात मनोज जरांगे यांचा डायलॉग आहे.
तर मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
(sangharsh yoddha, manoj jarange patil, sangharshyoddha teaser, sangharshyoddha movie, sangharshyoddha star cast, sangharsh yodha manoj jarange patil, sangharsh yoddha marathi movie,)