लग्नात अभिनेता प्रथमेश बायकोच्या पाया पडला – होतंय कौतुक | Prathamesh Parab Wedding

Prathamesh Parab Wedding 2

Prathamesh Parab Wedding: 4 फेब्रुवारीला दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब हा लग्नबंधनात अडकला आहे. प्रथमेश परबने क्षितीजा घोसाळकर सोबत लग्न केले आहे. प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नातील एका व्हिडीओने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओ मध्ये प्रथमेश आणि क्षितीजा एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत. पण यावेळी दोघंही एकमेकांच्या पाया पडताना पाहायला मिळाले. अभिनेता प्रथमेश परब हा सुद्धा वरमाळा घातल्यानंतर बायकोच्या पाया पडला आहे. दोघांच्या या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. त्यांच्या कृतीचे सोशल मिडीयावर कौतुक केलं जात आहे.

अभिनेता प्रथमेश आणि क्षितीजा यांचा हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला दोघांच्या नात्याला तीन वर्ष पूर्ण होताच त्यांनी साखरपुडा केला आणि आता लग्न केले आहे. या लग्नसोहळ्याला दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह ‘टाइमपास’ या चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. तसेच अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत इतर काही मराठी कलाकारांनीही या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांचे लग्न झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी सुभेच्छा.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top