Ravindra Mahajani: या कारणामुळे रवींद्र महाजानींना त्यांच्या आई-वडिलांनी दोनदा घरातून हाकलून दिले – पत्नी माधवीचा खुलासा

Ravindra Mahajanis parents threw

Ravindra Mahajani: माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या आत्मचरित्र पुस्तकात त्यांचे पती जेष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिल्या प्रमाणे अभिनेते रवींद्र महाजनी यांना सुरुवातीला व्यसन आणि जुगाराची सवय होती. याबद्दलचे अनेक किस्से त्यांनी सांगितले आहे. यात रवींद्र महाजनी यांना त्यांच्या आई-वडिलांनी दोनदा घरातून हाकलून दिले होते. याचाही खुलासा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात पेज नंबर 27 आणि 28 वर केला आहे. (Ravindra Mahajani’s parents threw him out of the house twice)

याबद्दल माधवी यांनी म्हटलंय की “एकदा मी कॉलेजमधून येत असताना रवी अचानक पुढ्यात आला. उदास, सैरभैर चेहरा. म्हणाला, ‘काल मी जुगारात माझ्याकडचे सगळे पैसे हरलो. ते मला वडिलांनी कॉम्प्युटर क्लासची फी भरण्यासाठी दिलेले होते. ‘ दादा म्हणजे ह. रा. महाजनी, रवीचे वडील. त्यांना सर्वजण त्यांची मुलेसुद्धा दादा म्हणत. तर, रवी मला म्हणाला, ‘आता जर मी अशा अवस्थेत घरी गेलो, तर दादा मला घरातही घेणार नाहीत. हाकलून देतील. काय करावं मला समजत नाही.’

त्याचा निरागस चेहरा पाहून मला एकदम भरून आलं. मागचापुढचा काहीही विचार न करता, मी माझ्या हातातल्या सहा सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या. त्यानं बिनधास्त त्या बांगड्या घेतल्या आणि निघून गेला.

घरी गेल्यावर आईनं विचारलंच, ‘अगं, हे काय? सोन्याच्या बांगड्या काय झाल्या तुझ्या ?’ मी गांगरले. सुचेल ती थाप ठोकली. म्हटलं, ‘अगं, लोकलमधे चढत असताना कुणीतरी माझ्या हातातून ओरबाडून घेतल्या. गर्दी इतकी होती… काहीच करता आलं नाही मला.’ आईला पुष्कळ हळहळ वाटली, पण बिचारी गप्प बसली. आई कधीही खोटं न बोलणारी. मी माझ्या आईशी प्रथमच व शेवटचं रवीच्या निरागस चेहेऱ्याकडे बघून खोटं बोलले. तिच्या कष्टाच्या पैशांनी तिने मला माझी हौस म्हणून ह्या बांगड्या करुन दिल्या होत्या. आजही त्या आठवणीने मी दुःखी होते.

दुसऱ्या दिवशी मला रवीचा एक मित्र भेटला आणि त्यानं मला विचारलं, ‘तू काल त्याला पैसे दिलेस का ?’ मी चपापून म्हटलं, ‘का?’ ‘काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हरला.’ तो म्हणाला. अर्थात् त्यानंतर रवीनं स्वतः भेटून मला पुन्हा तितकाच निरागस चेहरा करून सांगितलं, ‘आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तू दिलेल्या बांगड्या मोडून त्या पैशानं काल रात्रभर जुगार खेळलो, पण सगळेच पैसे हरलो मी.’

आता या कर्माला काय म्हणावं ! हे एक दुष्टचक्र झालं होतं. तो कायमच हरायचा आणि हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा जुगार खेळायचा. तेव्हाही हरायचाच. मी रवीशी लग्न करू नये असं माझ्या मित्रमैत्रिणी तर सांगत होत्याच; पण खुद्द रवीच्या आईसुद्धा मला म्हणाल्या, ‘याच्याशी तू लग्न करू नकोस. याच्या सवयी चांगल्या नाहीत. दोनदा घरातून हाकलून दिलेलं आहे आम्ही. तुझ्यासाठी मी दुसरा चांगला मुलगा पाहीन.’ पण मी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.”

तर अशा प्रकारचा खुलासा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. रवींद्र महाजनी यांचे वडील ह.रा.महाजनी हे एक स्वातंत्र्यसेनानी होते. तसेच रवींद्र महाजनी यांच्या आईंनी सुद्धा अनेक सामाजिक चळवळीत भाग घेतला होता. रवींद्र महाजनी यांना आई-वडिलांनी त्यांच्या व्यसन आणि जुगाराच्या सवयी मुळेच त्यांना दोनदा घरातून हाकलून दिल्याचा खुलासा माधवी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात केला आहे.

chautha anka book
1Our Pick
‘चौथा अंक’

माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top