Jau Bai Gavat Winner Ramsha: झी मराठीवरील जाऊ बाई गावात या रिऍलिटी शो च्या पहिल्या सीजनची विजेती ठरली आहे रमशा फारुकी. विजयी झाल्यानंतर रमशाचे सर्वजन कौतुक करत तिचे अभिनंदन करत आहे. खरंतर शो सुरु असतांनाही रमशा खूप चर्चेत होती. शांत राहून तिने दिलेल्या सगळ्या मोहिमा यशस्वीपणे अगदी हसत-खेळत पार केल्या होत्या. या शो मध्ये तिची हेअरकट सुद्धा खूप चर्चेचा विषय ठरला होता. तिच्या या हेअरकटला आता ‘रमशाकट’ म्हणूनही ओळखलं जातंय. गावातल्या अनेक मुलींनी तिच्यासारखाच रमशाकट मारला आहे. (Jau Bai Gavat Winner Ramsha Farooqui Biography)
जाऊ बाई गावात शो च्या पहिल्या सीजनची विजेती रमशा फारुकी ही एक मॉडेल तसेच अभिनेत्री आहे. पण या सोबतच ती एक बॅडमिंटन खेळाडू सुद्धा आहे. बॅडमिंटन या खेळात तिने अनेक बक्षिसं देखील मिळवली आहेत. रमशाला बॅडमिंटन खेळाडू असल्यानेच भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिच्या परिंदा या बायोपिक चित्रपटा मध्ये झळकण्याची संधी मिळाली होती.
रमशा फारुकीने अनेक जाहिराती आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत टीव्ही रिपोर्टर रिता ही भूमिका साकारली होती. यासोबतच युअर टर्न, क्राईम पेट्रोल, जरा हटके जरा बचके, झांसी की राणी, तेरा क्या होगा आलिया अशा काही चित्रपट आणि मालिकांमध्ये ती झळकली आहे.
पण रमशा फारुकीला खरी ओळख झी मराठीवरील जाऊ बाई गावात या रिऍलिटी शो मुळे मिळाली आहे. 3 महिन्यांची ही रोलरकोस्टर राईड सारखा असलेला शो जिंकल्यानंतर रमशा फारुकीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात ती म्हणाली की “Oh My God! तो क्षण जेव्हा सरांनी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि ‘जाऊ बाई गावातच्या’ पहिल्या पर्वातली विजेती आहे ‘रमशा’… तेव्हा मला वाटत होतं की मी स्वप्न पाहत आहे. गेली दोन महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले. तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानलं आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे.” असं रमशा म्हणाली आहे.
पुढे रमशा म्हणाली की “माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरीने इससे मुझे मिलाने की साज़िश की है” खरंच माझ्या आयुष्यातला सर्वात भारी क्षण आहे. मी स्वतःला हेच म्हणाली की, ही फक्त सुरुवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचं आहे आणि जसं ‘जाऊ बाई गावात’ या शोला 100 टक्के दिले आहे. तसंच पुढे ही द्यायचं आहे, कारण यशासाठी कुठचा ही शॉर्टकट नाही. माझ्या आभाराची यादी खूप मोठी आहे सुरुवात गावकऱ्यांपासून करेन मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली. थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं. मी कधी विचारही केला नव्हता की कोणी इतकं आपल्यावर प्रेमही करू शकत. ‘जाऊ बाई गावात’ आणि ‘झी मराठी’च्या पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानलं आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे. मी ठरवलं आहे की मी गावात एक घर घेणार, मी गावाच्या इतकं प्रेमात पडली आहे.” असं रमशाने म्हटलं आहे.
रमशा फारुकीने म्हटल्याप्रमाणे ही तिची सुरुवात आहे, अजून तिला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळेच रमशाला अभिनय क्षेत्रातील पुढील प्रवासासाठी तिला खूप साऱ्या सुभेच्छा.