अभिनेते रवींद्र महाजनी पत्नीला मारत असत, टेनिस रॅकेट घेऊन आईला मारण्यास धावले – गश्मीरचा खुलासा | Ravindra Mahajani

Gashmeer Mahajani about his father

Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वीच अत्यंत दुखद निधन झाले होते. त्यांच्या परिवारात सर्वकाही ठीक नव्हते. त्यामुळेच गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून रवींद्र महाजनी हे त्यांच्या परिवारापासून दूर पुण्यातील तळेगावात एका भाड्याच्या खोलीत एकटेच राहत होते. त्यांचा मृत्यू होऊन 2-3 दिवस झाले तरी कोणालाही समजले नाही. एका दिग्गज मराठी अभिनेत्याचे असे दुर्दैवी निधन व्हावे हे असंख्य मराठी प्रेक्षकांना मान्य होत नव्हते. यामुळेच त्यांची पत्नी माधवी आणि मुलगा गश्मीर महाजनी यांच्यावर खूप टीकाही झाली. (Actor Gashmeer Mahajani about his father Ravindra Mahajani and mother)

पण आता रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या काही महिन्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यात माधवी यांनी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. तसेच अभिनेता गश्मीर महाजनी यानेही वडिलांबद्दल काही खुलासे करत त्यांच्या जुन्या आठवणी या पुस्तकात लिहिल्या आहे. यात त्याने त्याचे वडील रवींद्र महाजनी हे त्यांची पत्नी आणि गाश्मिरची आई माधवी हिला मारहाण करायचे असा खुलासा गश्मीरने या पुस्तकात केला आहे.

रवींद्र महाजनी पत्नीस मारत असत

या पुस्तकात अभिनेता गश्मीरने म्हटलंय की “बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं. ते त्या आठवणीच ठरवतात. माणसांच्या स्मरणशक्तीचं हे फार मोठं रहस्य आहे. टेनिस प्रॅक्टिस संपवून 10 वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो. लिव्हिंग रुममधील टेबलवर माझं चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता. कोचावर काळा चष्मा लावून बाबा बसले होते आणि वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती. मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येताच जणू टाइम प्लीज घेतल्यासारखं थांबलं.

कोचावर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली, ‘गशू, पोलिसांना फोन लाव रे’. यानंतर बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्यावर धावून गेले. आई बेडरूमकडे धावली, बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचा आवाज घरभर घुमू लागला. घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्याजागी भोकाड पसरलं. थोड्यावेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले, माझी रॅकेट कोचावर ठेवली आणि ‘काही नाही झालं तुझ्या आईला’, असं म्हणत निघून गेले. त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत. फक्त कधी दार बडवलं जायचं, तर कधी आई एवढाच काय तो फरक.” असं गश्मीरने या पुस्तकात म्हटलंय.

जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं..

अभिनेते रवींद्र महाजनी हे अगोदर प्रेमभंग झाल्याने व्यसनाधीन आणि जुगारी झाले होते. त्यानंतर ते आणि माधवी एकमेकांच्या प्रेमात पडले. रवींद्र महाजनी हे काही काम करत नव्हते तसेच ते व्यसनाधीन आणि जुगारी असल्याने माधवीच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नास विरोध केला. पण तरीही माधवी यांनी रवींद्र महाजनी यांच्या सोबत प्रेमविवाह केला. याबद्दलची माहिती आपण “Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी व्यसनाधीन आणि जुगारी झाले होते – पत्नी माधवीचा खुलासा” या आर्टिकल मध्ये बघितली आहे.

अभिनेता गश्मीर याने ‘चौथा अंक’ या पुस्तकात वडिलांचे व्यसन आणि आईला सर्व माहित असूनही तिने लग्नाचा घेतलेला निर्णय याविषयी म्हटलंय की “We Are As Good As The Choices We Make. भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत ठरतात. आता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा, उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची पूर्णपणे कल्पना असते. घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हेदेखील आपल्या निश्चितपणे माहित असतं. हातात असलेली मालमत्ता बेफिकिरीने लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना (आईच्या बाबांना) माहित होते, बाबांशी लग्न करण्याचे काय परिणाम होती हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहित होते. जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहित होतं.” असं गश्मीरने म्हटलंय.

तसेच पुढे गश्मीरने लिहिले आहे की “असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते. पण खरं तर आपण इतिहासातून नीट शिकत नाही आणि म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते. या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाइप म्हणजेच मूळ नमुना असावा. स्वभावाला औषध नाही पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या-छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज तोच प्रयत्न करतोय, तुम्हीही करा.” असा सल्ला अभिनेता गश्मीरने सर्वांना दिला आहे.

ImageProductFeaturesPrice
Our Pick1
chautha anka book
‘चौथा अंक’

माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top