झी मराठीवर बिग बॉस सारखाच एक नवीन रिऍलिटी शो सुरु होतोय.

'जाऊ बाई गावात' असं झी मराठी वरील या रिऍलिटी शो चे नाव आहे.

या रिऍलिटी शो मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता हार्दिक जोशी सूत्रसंचालक म्हणून झळकणार आहे.

जाऊ बाई गावात हा शो 4 डिसेंबरपासून, सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर दिसणार आहे.

या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना गावाकडच्या वातावरणात राहण्याचे चॅलेंज देण्यात येणार आहे.

शहरात अत्यंत ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या काही तरुणींना काही दिवस आता एका खेडे गावात राहून तेथील कामे एका टास्क प्रमाणे करावे लागतील.

मग त्यात चुलीवर स्वयंपाक करणे आणि गायी-म्हशींचे शेन उचलने अशा प्रकारची कामे सुद्धा असणार आहे.

या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होत असलेल्या काही स्पर्धकांची नावे जाहीर झाली आहे.

संस्कृती साळुंके, स्नेहा भोसले, मोनिशा आजगावकर, श्रेजा म्हात्रे, रसिका ढोबळे आणि हेतल पाखरे या 6 स्पर्धकांचे प्रोमो रिलीज करण्यात आले आहे.

यापैकी संस्कृती साळुंके हिने क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयातून पदवी मिळवली आहे.

या शोमध्ये सहभागी होत असलेली दुसरी स्पर्धक स्नेहा भोसले हिला किक बॉक्सिंग आवडतं.

यांनतरच्या स्पर्धक श्रेजा म्हात्रे हि एक कमर्शिअल मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर आहे. 

तर मोनिशा आजगावकर हि एक फोटोग्राफर आणि एक्टिविस्ट आहे.

यासोबतच प्लस साईज मॉडेल हेतल पाखरे

आणि फॅशन दिवा म्हणून ओळखली जाणारी रसिका ढोबळे हि सुद्धा या शो मधील स्पर्धक आहे.

शहरातील श्रीमंतीत वाढलेल्या या स्पर्धक तरुणी खेडे गावातील आयुष्य कसं जगणार? हे पाहण्याची प्रेक्षकही आतुरतेने वाट बघत आहे.

जाऊ बाई गावात हा रिऍलिटी शो बिग बॉस या शो शी मिळता जुळता असल्याचा दिसतोय.

कारण येथेही 24 तास कॅमेऱ्यासमोर राहून हे स्पर्धक गावात राहण्याचा हा गेम कसा खेळता हे प्रेक्षकांना दाखवले जाणार आहे.

या शो मध्ये सुद्धा बिग बॉस सारखे स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत.