मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला जेरीस आणणारे 'मनोज जरांगे पाटील ' यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया.

'मनोज जरांगे पाटील ' (Manoj Jarange Patil) हे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे गेले काही दिवस उपोषणाला बसले होते.

अगोदर शांततेच्या मार्गाने त्यांचे उपोषण सुरु होते मात्र काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यामुळे हे आंदोलन खूप चर्चेत आलं.

लाठीचार्ज झाला तरीही हे जरांगे-पाटीलांचे उपोषण अजिबातही थांबले नाही. उलट इतर समाजाकडूनही त्यांना पाठींबा मिळाला.

"एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल" असं म्हणत मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन सुरू होते.

पण सरकारने आरक्षण देण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितल्याने  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले आहे.

आता तर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर एक चित्रपट सुद्धा येणार आहे.

दिग्दर्शन शिवाजी दोलताडे आणि निर्माते डी गोवर्धन दोलताडे असलेल्या या सिनेमाचं प्राथमिक नाव 'खळग' असल्याची माहिती मिळतेय.

अभिनेता रोहन पाटील हा या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांची भुमिका साकारणार असल्याची माहिती मिळतेय.

तर या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर 2023 पासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे म्हटले जात आहे.

तर मग कोण आहेत मनोज जरांगे पाटील यासाठी आता बघूया त्यांच्या आयुष्याविषयी थोडक्यात माहिती..

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे काम करत आहे.

सर्वसामान्य परिस्थिती वाढलेल्या मनोज यांचे शिक्षण 12वी पर्यंत झालं आहे.

हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.

त्यांचे मूळगाव बीड जिल्ह्यातील मातोरी (ता. शिरूर). पण नंतर ते जालन्यातील अंकुशनगर (ता. अंबड) येथे ते स्थायिक झाले.

पूर्णवेळ मराठा समाजासाठी कार्यरत असणाऱ्या मनोज जरांगे यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुले, तीन भाऊ आणि आई-वडील असा परिवार आहे.

जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

त्यांनी सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम केलं. पण वैचारिक मतभेदामुळे त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापन केली.

जरांगे पाटलांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं.

त्यांची यांची एकूण चार एकर जमीन होती, यातील दोन एकर जमीन त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी विकली.

आतापर्यंत त्यांनी मराठा आरक्षणासाठी 35 हून अधिक मोर्चे आणि आंदोलने केली आहे.