ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले.

अभिनेते रवींद्र बेर्डे हे 78 वर्षांचे होते. गेली काही वर्षे त्यांची कॅन्सर या आजराशी झुंज सुरू होती.

दोन दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटल मधून घरी आणले होते. मात्र त्यांना हार्ट अटॅकचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.

अभिनेते रवींद्र बेर्डे हे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू आणि नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे त्यांचे चुलत बंधू होते.

रवींद्र बेर्डे यांचा मुळातच विनोदी स्वभाव असल्यामुळे त्यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या. आणि खलनायकी भूमिका सुद्धा त्यांनी केल्या आहे.

नाटक, मालिका, जाहिराती आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून रवींद्र बेर्डे यांनी अतिशय अप्रतिम भूमिका साकारल्या.

'होऊन जाउ दे, हमाल दे धमाल, थरथराट, चगु मंगु, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा,' अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला.

तीनशेहून अधिक मराठी चित्रपटातून काम केलेले अभिनेते रवींद्र बेर्डे हे गेल्या काही वर्षांपासून अभिनया क्षेत्रापासून दूर होते.

1995 साली ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटक करत असताना त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला होता.

2011 पासून अभिनेते रवींद्र बेर्डे हे घशाचा कॅन्सर या आजराशी लढा देत होते.

गेले काही दिवसांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचारही सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

पण अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटल मधून घरी आणल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री हार्ट अटॅक मुळे त्यांचे निधन झाले.

ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.