स्टार प्रवाहवर नवीनच सुरू झालेल्या 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतील अभिनेता 'ध्रुव दातार' याचे नुकतेच 15 डिसेंबर 2023 रोजी लग्न झाले आहे.

अभिनेता ध्रुवच्या पत्नीचं नाव 'अक्षता तिखे' असून ती एक कोरिओग्राफर आहे.

अभिनेता ध्रुव दातार आणि अक्षता तिखे यांनी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केले आहे.

लग्नासाठी अक्षताने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

तर अभिनेता ध्रुवने जांभळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न सेट घातला आहे.

तसेच पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्येही ध्रुव आणि अक्षता अतिशय छान दिसत आहे.

लग्नात ध्रुव आणि अक्षता यांनी घातलेल्या या पारंपरिक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय.

अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या लग्नातील हे काही फोटो शेअर करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

त्यांच्या लग्नाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याखाली अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अभिनेता ध्रुव दातार हा अगोदर 'तू चाल पुढं' या मालिकेतही झळकला होता. यात त्याने शिल्पीच्या खास मित्राची भूमिका साकारली होती.

यानंतर आता 'लक्ष्मीच्या पावलांनी' या स्टार प्रवाह वरील मालिकेत तो झळकत आहे. यात तो नकारात्मक भूमिका साकारतोय.

अभिनेता ध्रुव दातार आणि अक्षता तिखे यांचे लग्न झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या सुभेच्छा.