झी मराठी वर 4 डिसेंबर पासून अभिनेता हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला आहे.

एक अफलातून संकल्पना असलेल्या या नवीन रिअ‍ॅलिटी शो मध्ये श्रीमंत आणि शहरात वाढलेल्या मुली या गावाकडील गावरान आयुष्य जगू शकणार का? हे सर्वांना पाहायला मिळणार आहे.

या शोमध्ये एकूण 11 स्पर्धक मुलींची निवड झालीय. तर या 11 स्पर्धक मुलीं कोण त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

‘जाऊ बाई गावात’ शो चा 4 डिसेंबर रोजी पहिला भाग प्रसारित झाला. यामध्ये शो मधील स्पर्धक मुलींची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या मतावरून 11 स्पर्धक मुलींना निवडण्यात आलं.

यामध्ये पहिली स्पर्धक होती मुक्ता करंदीकर. ती एक रॅपर आणि गायिक आहे.

यानंतर डॅशिंग लेडी डॉन स्नेहा भोसले,

छोटा पॅकेट बडा धमाका अंकिता मेस्त्री,

सुरेल संस्कारी गायक श्रेजा म्हात्रे,

पापा की परी संस्कृती साळुंखे,

फॅशन दिवा रसिका ढोबळे,

आपल्या मनाची राणी असलेली वर्षा हेगडे,

मॉडेल हेतल पाखरे,

अभिनेत्री आणि फोटोग्राफर वैष्णवी सावंत,

जिंकण्याचा स्वभाव असणारी रमशा फारुकी

आणि सगळ्यात हटके असणारी मोनिशा आजगावकर

या 11 स्पर्धक मुलींची 'जाऊ बाई गावात' या शो मध्ये निवड झाली आहे.