सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लावणी डान्सर ती म्हणजे 'गौतमी पाटील'

डान्सर गौतमी पाटील हि सतत वेगवेगळ्या वादात अडकत असल्याने तिच्या डान्स शोची सुद्धा खूप चर्चा होत असते.

आज गौतमी पाटील हि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डान्सर बनली आहे. तिच्या शो साठी प्रचंड गर्दी होत असते.

पण खऱ्या आयुष्यात गौतमी पाटीलची कहाणी खूप संघर्षमय आहे.

गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची. म्हणूनच तिला खान्देश कन्या असा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली.

अनेकजण गौतमी पाटीलचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार असल्याचे सांगतात. यामुळे खूप वादही झाला होता.

चोपडा हे गौतमीच्या वडिलांचे गाव. पण गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला वाऱ्यावर सोडून दिलं.

वडील दारुडे होते तसेच ते आईला मारहाण करायचे. यानंतर गौतमीच्या आईच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी त्यांचा संभाळ केला.

पण नंतर आठवीत शिक्षण सोडून गौतमी हि आई सोबत पुणे शहरात राहायला आली.

गौतमी आणि तिची आई पुण्यात स्थिरावल्यानंतर तिने वडिलांना परत घरी आणून एकत्र राहण्याचा प्रयत्न केला.

पण वडिलांचे दारू पेऊन आईला मारहाण करणे सुरुच राहिल्याने गौतमीने वडिलांना पुन्हा दूर केले.

पुण्यात गौतमी पाटीलची आई नोकरी करत होती. आईची नोकरी होती तो पर्यंत त्यांचे सर्वकाही सुरळीत सुरु होते.

पण पुढे आईचा अपघात झाल्यानंतर घरची सर्व जबाबदारी गौतमीवर आली.

गौतमीला लहानपणापासून नृत्याची (Dance) आवड होती. तिने डान्स क्लासही लावला होता.

त्यावेळी अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदाच लावणी केली तेव्हा तिला पाचशे रुपये बक्षीस मिळालं होतं.

यानंतर गौतमीने याच क्षेत्रात करियर करायचं ठरवलं. आणि इथूनच गौतमीचा एक डान्सर म्हणून खरा प्रवास सुरु झाला.

सुरुवातील गौतमी पाटील ही बॅकडान्सर म्हणून काम करत होती.

TikTok आणि Instagram मुळे गौतमीचे सोशल मिडियावर अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले.

तिची डान्स शो साठी मागणीही वाढू लागली आणि त्यामुळे ती बॅकडान्सर वरून फ्रंट डान्सर बनली.

आता तर अगदी छोट-छोट्या कार्यक्रमांसाठी सुद्धा लोक लाखो रुपये खर्चून गौतमीचा डान्स कार्यक्रम ठेवतात.

विशेषतः तरुणाई मध्ये गौतमीची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.

डान्स शो सोबतच आता गौतमी पाटील ही अभिनेत्री सुद्धा बनली आहे.

तिचा 'घुंगरू' हा पहिलाच चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

सध्या गौतमी पाटील आणि तिच्यामुळे होणारे वाद आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात.

सुरुवातीला गौतमी ही तिच्या अंगावर पाणी ओतण्याच्या तसेच कमी कपड्यांत केलेल्या अश्लील डान्स शो मुळे खूप वादात सापडली होती.

गौतमीच्या डान्स शोला प्रचंड गर्दी होत असल्याने कायदा सुव्यस्था आणि प्रशासनाच्या दृष्टीने मोठ्या समस्या निर्माण होतात.

तिच्या डान्स शो मध्ये अनेक तरुण हुल्लडबाजी करत असल्याने खूप वादही होतो.

काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने गौतमीचा कपडे बदलतांनाचा एक व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करून व्हायरल केला होता.

यामुळे खूप वादही झाला. यांनतर त्या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी गौतमीचे वडील 'रवींद्र नेरपगारे पाटील' हे रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत पडल्याचे सापडले होते.

ते या उतरत्या वयात एकटेच राहत होते. गौतमी हि तिच्या आई सोबत वेगळी राहते.

गौतमीच्या वडिलांकडे या वयात काहीही काम नसल्याने ते खूप आर्थिक अडचणीत होते. दोन वेळेच्या जेवणाचाही त्यांना प्रश्न पडला होता.

त्यामुळेच गौतमीने त्यांना खर्चायला पैसे द्यावे असं त्यांनी मिडिया समोर म्हटलं होतं. पण गौतमीने मात्र त्यांना कोणताही रिप्लाय दिला नाही.

शेवटी एक दिवस गौतमीचे वडील धुळ्यात रस्त्याच्या कडेला बेवारस मरणासन्नावस्थेत पडल्याचे सापडले.

स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांनी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.

ओळख पटवण्यासाठी त्यांचा फोटो आणि आधार कार्ड व्हायरल केला असता ते गौतमी पाटीलचे वडील असल्याची माहिती समोर आली.

वडील प्रचंड आजारी असून ते बेवारस अवस्थेत सापडल्याची माहिती गौतमीला मिळाली.

त्यानंतर माणुसकी दाखवत गौतमीने वडिलांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवले.

पण त्यांची अवस्था खूपच खराब झाल्याने डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाही.

शेवटच्या क्षणी का होईना पण गौतमीने वडिलांची साथ दिली.